ओझर येथे शॉक लागून मायलेकीचा दारुण अंत, जावई दोन मुले थोडक्यात वाचली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 04:49 PM2023-08-06T16:49:24+5:302023-08-06T16:50:34+5:30

दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला.

mother daughter end in shock at Ozer, son-in-law and two children narrowly escaped | ओझर येथे शॉक लागून मायलेकीचा दारुण अंत, जावई दोन मुले थोडक्यात वाचली

ओझर येथे शॉक लागून मायलेकीचा दारुण अंत, जावई दोन मुले थोडक्यात वाचली

googlenewsNext

सुदर्शन सारडा

ओझर (नाशिक) : येथील दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी अन् मुलीला डोक्यावर असलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागून  जागीच मृत्यू झाला.घरावरच्या गच्चीतील  पेरू तोडत असताना हातातील रॉड हा हाय टेन्शन वायरला लागल्याने मीना हनुमंत सोनवणे ,आकांक्षा राहुल रणशूर या मायलेकिंचा जागीच मृत्यू झाला.

पती राहुल रणशूर व त्यांच्या दोन बालकांना शॉक मुळे लांब फेकल्याने ते बचावले. सदर घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली पण गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह  उतरला होता.ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन साठी पिंपळगाव येथे पाठवले असून सायंकाळी उशिरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.

Web Title: mother daughter end in shock at Ozer, son-in-law and two children narrowly escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक