निसर्गाला आई मानुनी, पूजा करतो सूर्याची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:15 PM2020-08-10T22:15:51+5:302020-08-11T01:17:41+5:30

नाशिक : जिल्ह्यात आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारे उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आदींना अभिवादन करण्यात आले. प्रतिमापूजन, रॅली काढून साध्या पद्धतीने शारीरिक अंतर ठेवून कार्यक्रम साजरे करण्यात आले.

Mother Manuni worships nature, the sun ... | निसर्गाला आई मानुनी, पूजा करतो सूर्याची...

मालेगाव तालुक्यात गरबड येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रतिमपूजन प्रसंगी उपस्थित चिंतामण भांगरे, भीमराव भांगरे, झेलाबाई सोनवणे, नाना रगतवाण, संजय भांगरे, गोरख नाडेकर, देवीदास कावळे, रंगनाथ भोईर आदी.

Next
ठळक मुद्देजागतिक आदिवासी दिन : जिल्हाभरात विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संस्थांच्या वतीने आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारे उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे आदिवासी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा आदींना अभिवादन करण्यात आले. प्रतिमापूजन, रॅली काढून साध्या पद्धतीने शारीरिक अंतर ठेवून कार्यक्रम साजरे करण्यात आले.
मालेगावी हुतात्मा स्मारकात क्रांतीकारकांना अभिवादन
मालेगाव : आॅगस्ट क्रांती दिना निमित्त येथील हुतात्मा स्मारक येथे भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाºया थोर क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तहसीलदार चंद्रजित राजपूत, मनपा प्रभाग अधिकारी हरिष डींबर, स्वातंत्र्यसैनिक त्रीलोकचंद पहाडे, निखिल पवार, हरिष मारू, केवळ हिरे, अमित खरे, जे एच वाघ, कुंदन चव्हाण, प्रवीण चौधरी, ललित वाघ, मनपा अभियंता मुरलीधर देवरे, मंडळ अधिकारी निकम, उद्यान निरीक्षक निलेश पाटील, शिवाजी पाटील, सजन पाटील आदी उपस्थित होते.
आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन
सायखेडा : ओझर मिग येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आद्य क्र ांतिकारक राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजप विस्तारक नितीन जाधव, भाजप माजी सैनिक आघाडी प्रदेश कमिटी सदस्य श्रीराम आढाव, योगेश चौधरी, माजी सरपंच धर्मेंद्र जाधव, किशोर ढोकळे, दीपक श्रीखंडे, प्रशांत गोसावी, कैलास खैरे, रतन बांडे, शिवदास पाटील आदी उपस्थित होते.
आगासखिंड येथे रक्तदान शिबिर
सिन्नर : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगासखिंड येथे आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य, आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,आदिवासी पावरी पथक बोरखिंड व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र रक्तपेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी रोशन तळपाडे, सागर कवटे, नितीन पाडेकर, तुषार खोकले, विकास कवटे, संदीप खोकले, रोहित पाडेकर, उत्तम कडव, तुषार डगळे, पंढरी वागळे यांनी रक्तदान केले.
खर्डेत आदिवासी दिन
खर्डे : गुंजाळनगर येथे एकलव्य भिल्ल सेनेचे संस्थापक अध्यक्ष रघू नवरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा, तंट्यामामा व वीर एकलव्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वर्भूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करत संपूर्ण तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांनी शैक्षणिक प्रवाहात सामील व्हावे व व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन नवरे यांनी केले. यावेळी विकी सोनवणे, सरपंच बळीराम वाघ, राजेंद्र वाघ, ज्ञानेश्वर सोनवणे, सागर गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, चेतन माळी, चेतन माळी, सुभाष माळी, लखन पवार, लक्ष्मण माळी, भावशिंग वाघ, बाबाजी माळी, रोहित शिंदे, सुभाष वाघ, शरद पवार, बबलू जाधव आदी उपस्थित होते.
सिन्नरला क्रांतिदिन अभिवादन
सिन्नर : आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त वंदे मातरम् संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालय आवारातील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात, राज्यात आणि शहरात १४४ कलम लागू असल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत व सामाजिक अंतर राखत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जितूभाई कोथमिरे होते. सहायक उपनिरक्षक गणेश परदेशी, संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक संतोष शिंदे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. सिन्नर नगर परिषदेचे शहर अभियान व्यस्थापक अनिल जाधव, लायन्स क्लब आॅफ सिन्नर युनिटीच्या वतीने अध्यक्ष डॉ. महावीर खिंवसरा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
क्रांतिदिनाचे महत्त्व खूप मोठे असून, प्रशासनाने देखील या दिवसाचे महत्त्व ओळखून नागरिकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाच्या प्रमुखांनी उपस्थित राहून हुतात्मा स्तंभाचे पावित्र्य राखावे, असे मत संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. महावीर खिंवसरा यांनी केले. वंदे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Web Title: Mother Manuni worships nature, the sun ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.