स्वामी समर्थ परिवाराच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 06:52 PM2018-12-26T18:52:15+5:302018-12-26T18:52:59+5:30

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेच सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने बुधवारी (दि.२६) दिंडोरी येथे निधन झाले.

Mother Shree Shakuntala More More of Swami Samarth family | स्वामी समर्थ परिवाराच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे निधन

स्वामी समर्थ परिवाराच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देशकुंतलातार्इंमागे गुरु माऊलींसह अशोक, अनिल, शेखर ही चार मुले, सुना, पाच मुली, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेच
सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने बुधवारी (दि.२६) दिंडोरी येथे निधन झाले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग भारत व भारताबाहेर सुमारे ७००० सेवाकेंद्रांच्या माध्यमातून कार्यरत आहे. सुरवातीस सद्मुरु दादासाहेब मोरे तद्नंतर आण्णासाहेब मोरे यांचे बरोबर सेवामार्गाच्या वृद्धीसाठी शकुंतला तार्इंनी अपार कष्ट घेतले. आपले नाव कुठेही येऊ न देता तसेच प्रसिद्धी पासून दूर राहत कायम त्यांनी पडद्याआड राहून स्व. दादासाहेब मोरे, आण्णासाहेब यांच्याइतकीच महत्वाची भूमिका सेवामार्गासाठी निभावली. आपल्या कष्ट व मदतीचा कोठेही एका शब्दाचा उल्लेख त्यांनी कधीही केला नाही. नि:स्वार्थी, प्रेमळ, उदार अंत:करणाच्या शकुंतलातार्इंनी आजीवन प्रत्येक सेवेकऱ्याची आस्थेने विचारपूस व आतिथ्य केले. चंद्रकांत दादा, नितीन भाऊ व आबासाहेब मोरे ही नातवंडे आज सेवामार्गाचे कार्य जोमाने पुढे नेट आहेत. यामागे आजी शकुंतलातार्इंनी केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. शकुंतलातार्इंमागे गुरु माऊलींसह अशोक, अनिल, शेखर ही चार मुले, सुना, पाच मुली, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे. (२६ शकुंतला मोरे)

Web Title: Mother Shree Shakuntala More More of Swami Samarth family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू