आई, वडिलांच्या ऋणात राहा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 10:31 PM2020-02-05T22:31:32+5:302020-02-06T00:48:07+5:30
चांदवड : आपण सर्वांनी आई-वडिलांच्या ऋणात राहावे अशा आशयाच्या कवितांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. ...
चांदवड : आपण सर्वांनी आई-वडिलांच्या ऋणात राहावे अशा आशयाच्या कवितांना प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. येथील सुराणा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. विलास बागुल यांच्या साथ-संगत काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.
प्रा. विलास बागुल यांच्या कवितेत मूल्यांची होणारी पडझड, स्रियांच्या अत्याचाराचे सत्र या सर्वांचे प्रतिबिंब आहे. शिवाय आई-वडिलांच्या ऋणांची भावनादेखील अतिशय कारुण्यदायी आहे, असे प्रतिपादन कवी अशोक नायगावकर यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त समितीचे मानद सचिव जवाहरलाल आबड होते. प्रास्ताविकात प्रा. विलास बागुल यांनी या काव्यसंग्रहाच्या निर्मिती मागील प्रेरणा ही आपली पत्नी हेमलता बागुल आहे, तिला मृत्यूच्या दारातून परत आणताना झालेली घालमेल, त्यावेळी या कविताच साथ देत होत्या. म्हणून हा साथ-संगत तिला अर्पण करतो असे प्रतिपादन केले. जी. एच. जैन, साहित्यिक राजेंद्र मलोसे, पी. पी.गाळणकर, पी. व्ही. ठाकोर यांच्या प्रमुख उपस्थितीत या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. अशोक नायगावकर यांनी या काव्यसंग्रहातील आई विषयावरील कवितांची े दखल घेतली. सूत्रसंचालन तुषार चांदवडकर यांनी केले. आभार पी. यू. वेताळ यांनी मानले.
व्ही. डी. बागुल यांच्या कविता या प्रेरणादायी असून, पती-पत्नीच्या आदर्श नात्याचे यात जे प्रतिबिंब पडते आहे, ते खूपच स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जवाहरलाल आबड यांनी केले.