सुरगाण्यात आईचा; निफाड तालुक्यात वडिलांचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:28 AM2020-02-19T02:28:43+5:302020-02-19T02:29:10+5:30
रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथेही दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. दारूच्या नशेत बुद्धिभ्रष्ट झालेले पुत्रच जन्मदात्यांचे वैरी ठरल्याने नात्यांचा खून करणाऱ्या या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला.
सुरगाणा/निफाड : रक्ताचे नातेच जिवावर उठण्याच्या दोन घटना मंगळवारी (दि. १८) सुरगाणा आणि निफाड तालुक्यात घडल्या. सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथे दारूच्या नशेत पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या आईची कुºहाडीने घाव घालून हत्या केली, तर निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथेही दारूच्या नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात कुºहाडीने वार करत त्यांचा निर्घृण खून केला. दारूच्या नशेत बुद्धिभ्रष्ट झालेले पुत्रच जन्मदात्यांचे वैरी ठरल्याने नात्यांचा खून करणाऱ्या या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरला.
सुरगाणा तालुक्यातील सुभाषनगर येथील केळीची माळी येथे दारूच्या नशेत मुलाने जन्मदात्या आईला कुºहाडीने घाव घालून तिची हत्या केली. देवीदास लक्ष्मण गावित असे या तरु णाचे नाव आहे. त्याची पत्नी सरला गावित यांनी तक्र ार दाखल केली आहे. देवीदासची पत्नी सरला हीस आजार असल्यामुळे ती अंथरूणाला खिळून होती. एकाच घरात मात्र वेगवेगळे राहात असलेल्या देवीदास व त्याची आई या दोघांनाही दारूचे व्यसन होते. अशातच आई व मुलगा यांच्यात त्याच्या पत्नीवरून वाद होत असायचे. मंगळवारीही वाद झाल्याने देवीदासला राग अनावर झाला आणि त्याने कुºहाडीने घाव घालत आई सोनूबाई हिचा खून केला.
पोलिसांनी नशेत चूर असलेल्या देवीदास यास अटक केली आहे. दुसरी घटना निफाड शहरालगत असलेल्या सोनेवाडी बुद्रुक येथे घडली. कमलेश निरभवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा भाऊ बबन हा दारू पिऊन घरी आला. त्याच्या पत्नीशी वाद घालत असतानाच वाद सोडविण्यासाठी गेलेल्या वडिलांवरच त्याने कुºहाडीने घाव घातला. या घटनेत निवृत्ती निरभवणे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला सोनेवाडी शिवारातून अटक केली आहे.
रक्ताच्या नात्याला काळिमा
रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाºया या दोन्ही घटनांमध्ये बरेचसे साम्य आहे. दोन्ही घटनांमध्ये दारूच्या नशेने घात केलेला आहे तर कुºहाडीसारख्या धारदार शस्राचा वापर झालेला आहे. राग आणि वादातूनच या दोन्ही घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत काही अंतराच्या फरकाने झालेल्या या घटनांनी मात्र जिल्ह्याला हादरवून सोडले आहे.