जगात आईच खरी गुरू :शांतीगिरी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:25 AM2018-11-13T00:25:20+5:302018-11-13T00:26:08+5:30
जगात आई हीच खरी गुरू असून, इतर नात्यापेक्षा गुरूबंधू, गुरू-शिष्य नाते हे खरे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी मुलांनी संतांचे विचार आचारणात आणावे, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी केले.
नाशिकरोड : जगात आई हीच खरी गुरू असून, इतर नात्यापेक्षा गुरूबंधू, गुरू-शिष्य नाते हे खरे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी मुलांनी संतांचे विचार आचारणात आणावे, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी केले. संत श्री जनार्दन स्वामी यांच्या २९व्या पुण्यस्मरणार्थ १३ ते २० डिसेंबरपर्यंत श्री क्षेत्र वेरूळ येथे होणाऱ्या जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी सिन्नर फाटा येथे झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. संत जनार्दन स्वामींचे पुण्यस्मरण हे संत पर्वकाल महान आहे. देशभक्ती, धर्मकार्य, समाज कार्यासाठी होणाºया या जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळ्यासाठी प्रत्येक गाव व शहरातून जास्ती जास्त भक्तांनी अनुष्ठानात सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी केले. यावेळी निवृत्ती कांडेकर, बाळासाहेब गामणे, अशोक खालकर, मंगेश डेर्ले, रवींद्र भोई, शांताराम सांगळे, सुदाम सोनवणे, बापू काशिंद, अंबादास आगळे आदींसह भक्तगण उपस्थित होते.