भाजलेल्या चिमुकलीला उपचार मिळविण्यासाठी मातेची धडपड कॉलेज रोड : फिरस्त्या मायलेकीला ह्य१०८ह्ण रुग्णवाहिकेने दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:48 AM2021-02-11T00:48:12+5:302021-02-11T00:48:47+5:30

नाशिक : शहरातील कॉलेज रोड भागात भटकंती करत लोकांकडे हात पुढे करून मिळेल ते दान पदरात घेत, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मातेची धडपड तिच्या भाजलेल्या बाळाला वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी मागील दोन दिवसांपासून सुरू होती.

Mother's struggle to get treatment for burns Chimukali College Road | भाजलेल्या चिमुकलीला उपचार मिळविण्यासाठी मातेची धडपड कॉलेज रोड : फिरस्त्या मायलेकीला ह्य१०८ह्ण रुग्णवाहिकेने दिला दिलासा

भाजलेल्या चिमुकलीला उपचार मिळविण्यासाठी मातेची धडपड कॉलेज रोड : फिरस्त्या मायलेकीला ह्य१०८ह्ण रुग्णवाहिकेने दिला दिलासा

Next

अझहर शेख
नाशिक : शहरातील कॉलेज रोड भागात भटकंती करत लोकांकडे हात पुढे करून मिळेल ते दान पदरात घेत, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मातेची धडपड तिच्या भाजलेल्या बाळाला वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी मागील दोन दिवसांपासून सुरू होती. बुधवारी (दि.१०) ही माता आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला खांद्यावर घेऊन कॉलेज रोड भागात दिवसभर भटकंती करत होती. मात्र, कोणत्याही दवाखान्यात या गोरगरीब मायलेकीला दाद मिळू शकली नाही, अखेर शासनाच्या ह्य१०८ह्ण रुग्णवाहिकेने आलेल्या ह्यकॉलह्णला प्रतिसाद देत धाव घेतली अन‌् त्या मायलेकींना सायंकाळी रेस्क्यू केले.
मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील असलेल्या या मायलेकी काही वर्षांपूर्वी नाशकात रोजगाराच्या शोधात आल्या. मात्र, कुठेही रोजगार मिळाला, तर त्याचे ह्यमोलह्ण मिळू शकले नाही. नियतीने पदरात टाकलेले अठराविश्वे दारिद्र्य झेलत, या महिलेने अखेर समाजापुढे हात पसरण्याचा मार्ग नाईलाजाने स्वीकारला. रस्त्यालगत उघड्यावर मांडलेल्या चुलीवर पोटाची भूक शमविण्यासाठी भाकरी थापत असताना मातेची नजर चुकली अन‌् दुर्घटना घडली. पंधरवड्यापूर्वीच चिमुकल्या लेकीला आगीच्या ज्वालांची झळ बसल्याने तिची पाठ पूर्णत: भाजली गेली. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या मातेपुढे आपल्या लेकीच्या उपचाराचा मोठा प्रश्न उभा राहिला. तिने शहरातील उच्चभ्रू भागात जेथे दिवसभर भटकंती करत हात पुढे करते, त्या भागातील दवाखान्यांचा उंबराही गाठला. मात्र, पदरी पडली ती निराशाच...!
-इन्फो--
कडाक्याच्या थंडीमुळे असह्य वेदना अन‌्....

चिमुकलीच्या भाजलेल्या पाठीच्या जखमा भरून न आल्यामुळे कडाक्याच्या थंडीने तिला असह्य वेदना मंगळवारी रात्रीपासूनच होऊ लागल्या होत्या. तात्पुरत्या स्वरूपात ह्यदानाह्णमधून मिळालेल्या रकमेतून त्या मातेने एका मेडिकलमधून मलम घेत, त्या लेकीच्या जखमांवर लावण्याचा प्रयत्नही केला. काही वेळ दिलासा मिळाला. मात्र, संध्याकाळी हवेत गारवा निर्माण होताच, पुन्हा वेदनांनी लेकीचे अश्रू घळाघळा वाहू लागल्याने मातेचे मन हेलावून गेले.
--इन्फो--
ह्यफूड डिलिव्हरी बॉयह्णची जागरूकता

मातेची धडपड अन चिमुकलीची भाजलेली पाठ बघून येथील एका रेस्टॉरंटजवळ आलेल्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या सुशिक्षित जागरूक युवकाचे संवेदनशील मन हादरून गेले. त्या मातेला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि प्रसंगावधान राखत मोबाइलवरून तत्काळ ह्य१०८ह्ण क्रमांक फिरविला. काही वेळेत डॉ. शिल्पा पवार या १०८ रुग्णवाहिकेतून कॉलेज रोड येथे दाखल झाल्या अन‌् तेथील विठूमाउली मंदिराच्या उंबऱ्यावर बसलेल्या या मायलेकीला रेस्क्यू करत रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

 

Web Title: Mother's struggle to get treatment for burns Chimukali College Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.