‘समृद्धी’च्या मोबदल्यासाठी आईचे दोन दशक्रिया विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:36 AM2018-10-07T00:36:29+5:302018-10-07T00:37:17+5:30
घोटी : संपत्तीच्या मोहापुढे रक्ताच्या नात्यातीलही बंध गळून पडतात. त्याचा गंभीर प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात असलेल्या गंभीरवाडीत आला. आपल्या आई-वडिलांची संपत्ती आणि ‘समृद्धी’ प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा लाखो रुपये मोबदला आपल्यालाच मिळावा यासाठी इगतपुरी तालुक्यातील एका गावात मृत आईचे एकाच दिवशी दोन दशक्रिया विधी घालण्याचा प्रकार शनिवारी (दि. ६) घडला. विधीदरम्यान काही वाद होऊ नये यासाठी मृत पत्नीच्या पतीने पोलीस बंदोबस्ताचीही मागणी केली होती. अखेर पोलीस बंदोबस्तातच हा विधी पार पाडला गेला.

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारातील मोठ्या प्रमाणात शेतजमीन समृद्धी महामार्ग या प्रकल्पासाठी शासनाने खरेदी केली आहे. धामणगाव अंतर्गत असणाऱ्या गंभीरवाडी येथील नाना सोमा नाडेकर या वृद्धाची वडिलो-पार्जित शेतजमीन आहे. यातील काही जमीन मुलगा बंडू नाना नाडेकर याच्या नावाने आहे. काही जमीन समृद्धी महामार्गासाठी गेल्याने या जमिनीचा मोबदला मुलाला मिळाला आहे. मात्र वडिलोपार्जित जमीन असल्याने ‘या मोबदल्याचे आम्हीही हक्कदार आहोत. (पान ५ वर)
आणि हा मोबदला आम्हालाही दे’ असा आग्रह त्यांच्या बहिणींनी धरला. परंतु, बंडू नाडेकर यांनी मोबदला देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, जयवंताबार्इंचा दशक्रिया विधी असल्याने त्यात काही वाद होऊ शकतो, यामुळे पोलीस बंदोबस्त मिळावा अशा मागणीचा अर्ज नाना नाडेकर यांनी घोटी पोलिसांना दिला होता. त्यात मुलासह त्याच्या कुटुंबीयाने आपल्याला अंत्यविधीच्या दिवशी मारहाणही केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी नाना नाडेकर यांनी आपल्या मुलींना सोबत घेत दशक्रिया विधी पार पाडला, तर बंडू नाडेकर यांनीही स्वतंत्रपणे दशक्रिया विधी केला. दरम्यान, घोटी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या सूचनेनुसार हवालदार बिपीन जगताप यांनी गावात जाऊन परिस्थिती हाताळली आणि दोन्ही बाजूकडे दशक्रिया विधी शांततेत पार पाडला गेला. संपत्तीवरून एकाच गावात दोन ठिकाणी दशक्रिया विधी होण्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.
बहीण-भावामध्ये अनेकदा वाद
आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मुलानेच विभक्त ठेवल्याने बहीण-भावामध्ये अनेकदा वादाचे प्रसंग घडले असल्याचे सांगितले जाते. अशातच नाना नाडेकर यांच्या पत्नी जयवंताबाई नाडेकर यांचे दि. २७ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला बंडू नाडेकर यास येऊ दिले नव्हते.