आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:34+5:302021-07-20T04:11:34+5:30

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. ...

The mother's worries increased, sending the children to school with stones on their shoulders | आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतात शाळेत

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवतात शाळेत

googlenewsNext

सायखेडा : शासनाने आठवीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आणि प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. एक महिना ज्या गावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाले नाही, त्या गावातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असल्या तरी मुले शाळेत गेल्यावर आईची काळजी वाढली आहे. शाळेत येणारी मुले एकाच कुटुंबातील नाहीत. शिवाय कुटुंबातील माणसे कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यामुळे भीती आहे शिवाय सार्वजनिक ठिकाणी वाढत असलेली गर्दी आणि दुकानात होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्यामुळे आईला काळजी आहे.

मुलांचे शिक्षण देखील महत्त्वाचं आहे. ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येतात. ग्रामीण भागात स्मार्ट फोन नाही, फोनला रेंज नाही, शिवाय पालक फोन घेऊन शेतात जातात त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात मोठी अडचण येते. त्यामुळे शाळा प्रत्यक्ष सुरू व्हाव्यात अशी सर्वांची इच्छा आहे पण त्यासोबत काळजी पण आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा समावेश असणार आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असे अनेक तज्ज्ञ सांगत असल्यामुळे लहान मुलांना शाळेत संसर्ग होणार नाही याची काळजी आईला आहे. शिवाय शाळेत योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी होत आहे.

-------------------------

कोरोनाची भीती कायम आहे, अजून शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलांच्या गावातील कोरोना संख्या कमी झाली नाही. एका शाळेत येणारी मुले अनेक गावातील असतात. त्यामुळे भीती कायम आहे. शिवाय मुले शाळेत दूर राहात असली तरी सुट्टीत आणि येता जाता सोबत राहतात, जेवण सोबत करतात, त्यामुळे भीती वाटते, पण शिक्षणही महत्त्वाचं आहे. दीड वर्षापासून मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास थांबला आहे.

- उषा खालकर, आई, भेंडाळी (निफाड) (१९ उषा खालकर)

----------------------

माझी मुलगी ऋत्विजा ही दहावीमध्ये शिकत आहे. ती शाळेत जाताना स्वतःची व्यवस्थित काळजी घेते. नियमित मास्क वापरते. शाळेत जाताना सॅनिटायझर घेऊन जाते. दर एक तास झाल्यावर बेंच सॅनिटाईज करुन घेते. स्वतःची कोणतीही वस्तू इतरांना देत नाही. शाळेतून घरी आल्यावर कपडे बदलून धुण्यास टाकते. स्वच्छ अंघोळ करून मगच घरात वावरते.

- रेणुका काळे, ठाणगाव, ता. सिन्नर (१९ रेणुका काळे)

--------------------------

आमची मुले गेल्या दीड वर्षापासून घरीच आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही, याची भीती कायम असूनही मुलांना शाळेत पाठवावेव लागत आहे. काळजी घेत शिक्षण सुरू ठेवणे गरजेचे आहे. मुलांना तशी समज कमी असली तरी त्यांना हात धुण्यास सांगितले आहे. गर्दी टाळणे,घरी आल्यावर अंघोळ करणे,कपडे धुणे अशी काळजी घेत मुलांचे शालेय शिक्षण सुरू ठेवावे लागत आहे.

- पूनम पुरकर, संगमेश्वर, मालेगाव (१९ पुनम पुरकर)

-----------------

घरी आले की अंघोळ करून कपडे बदला

शाळेत मुले एकाच ठिकाणी घोळका करून उभे राहू शकतात किंवा सोबत ये-जा करतात, जेवण सोबत करतात. अनेक महिन्यानंतर मित्र मैत्रीण भेटल्यामुळे आपुलकीने हितगुज करतात. त्यामुळे घरी आल्यावर मुलांनी अंघोळ करून कपडे बदलावीत, दप्तर, डबा सॅनिटाईझ करावा.

- डॉ. प्रल्हाद डेर्ले, माऊली हॉस्पिटल

190721\19nsk_24_19072021_13.jpg

१९ रेणुका काळे, १९ पूनम पूरकर

Web Title: The mother's worries increased, sending the children to school with stones on their shoulders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.