मातोरी गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:27 AM2019-05-16T00:27:45+5:302019-05-16T00:28:10+5:30

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शहरानजीकच्या मातोरी गावालाही करावी लागत आहे.

Mothori thirsty thirsty village | मातोरी गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक

मातोरी गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक

Next

मातोरी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शहरानजीकच्या मातोरी गावालाही करावी लागत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेती विकासाला चालना देणारा व गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक पडल्याने शेतकऱ्यांना द्राक्षबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली आहे.
मातोरी गावाच्या समृद्धीला चालना देणारा विस्तीर्ण असा सुमारे चौदा एकर क्षेत्रात बनविण्यात आलेला पाझरतलाव सद्यस्थितीत कोरडाठाक पडला आहे. या पाझरतलावावर सुमारे सहासे ते सातशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून, यामुळे साठलेल्या पाण्याने मोठा आधार होतो. तसेच गावातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना पिण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो, परंतु यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तलावात एक थेंबही पाण्याचा राहिला नाही. विहिरीही कोरड्याठाक पडत पडत आहेत. जनावरे जगविण्याचे मोठे आव्हान बळीराजापुढे येऊन उभे ठाकले असून, या पाझरतलावाची क्षमता दोन गावाला जगवेल एवढी असतानादेखील त्याच्याकडे पहायला शासनाला वेळ नाही.
शेतकºयांनी आशा सोडली
शेतकरी वर्ग अनेकदा आपले गाºहाणे जलसंपदा विभागाकडे घेऊन गेले, पण प्रत्येक विभागाने हा पाझरतलाव आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण केल्याने अखेर शेतकºयांनी आशा सोडून दिली. शासनाच्या पाणलोट विकासाचा फायदा झाला न कोणत्याही योजनेचा. पाझर तलावाच्या पालकत्वाचा मुद्दा जलसंपदा विभाग नाकारत असल्याने पाण्याची कमतरता कायम आहे.

Web Title: Mothori thirsty thirsty village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.