आरटीईत पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:09 PM2019-04-25T15:09:47+5:302019-04-25T15:15:22+5:30

आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

Motion for admission to students who got opportunity in the first lot in RTÉ | आरटीईत पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूदतवाढ

आरटीईत पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूदतवाढ

Next
ठळक मुद्देआरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ४ मे पर्यंत मूदत पहिल्या लॉटरीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना मूदतवाढ ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ प्रवेश

नाशिक: आरटीई अंतर्गत पहिल्या सोडतीत नावे असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी शहरात १ हजार ३८ तर संपूर्ण जिल्ह्यात २ हजार १३४ मुलांचे प्रवेश निश्चित झाले असून, अद्यापही १ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी मिळावी यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांतील एकूण जागांपैकी २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल घटकांतील  बालकांना प्रवेश दिला जातो. या जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी ५ ते ३० मार्च दरम्यान आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. नर्सरी आणि पहिल्या वर्गासाठी जिल्हाभरातून उपलब्ध जागांच्या तीन पट म्हणजे १४ हजार ५५३ अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी राज्यासाठी पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यात नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ५१७ मुलांची निवड झाली असून, त्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत नाव असलेल्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, पहिल्या यादीत काही पालकांनी खोटे अंतर व खोटा पत्ता नमूद केल्याचा आरोप या यादीतून वंचित राहिलेल्या पालकांनी केला आहे. 

Web Title: Motion for admission to students who got opportunity in the first lot in RTÉ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.