आरटीई प्रवेश प्रकियेला सात मार्चपर्यंत मूदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:43 PM2018-02-28T17:43:04+5:302018-02-28T17:43:04+5:30
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 2018-19 या शैक्षणिक वर्षातील 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मूदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचे अर्ज 7 मार्चर्पयत ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करता येणार आहे.
नाशिक : आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी 2018-19 या शैक्षणिक वर्षातील 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मूदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचे अर्ज 7 मार्चर्पयत ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर सादर करता येणार आहे.
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखवी असलेल्या 25 टक्के जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत असून 10 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत 28 फेब्रुवारीर्पयत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मूदत देण्यात आली होती या मूदतीत नाशिक जिल्ह्यातील सुमारे 8 हजार 827 विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज आरटीईच्या संकेतस्थळावर प्राप्त झाले आहे. यात गुरुवारी जवळपास 638 विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलान अर्ज सादर केले आहेत. परंतु काही विद्यार्थी मूदत संपल्यामुळे शिक्षणाच्या हक्कापासून वंचीत राहू नये यासाठी शिक्षण विभागाने मूदत वाढ दिल्याने उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचे अर्ज 7 मार्च र्पयत संकेतस्थळावर सादर करता येणार आहे. जिल्हाभरातील विविध 466 शाळांमधील पूर्व प्राथमिक व पहिलीच्या सहा हजार 589 जागांवरील प्रवेशासाठी ही प्रवेशप्रक्रिया राबवली जात असून, संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. एक लाख रु पयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांचे पाल्य प्रवेशास पात्र ठरणार असून, 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी एकदाच अर्ज भरता येणार आहे.