अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली; आयुक्त दीर्घकालीन रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:59+5:302021-03-19T04:13:59+5:30
गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त कासार यांच्या विरोधात नगरसेवकांकडून अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू आहेत. माजी महापौर रशीद शेख यांनी ...
गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त कासार यांच्या विरोधात नगरसेवकांकडून अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू आहेत. माजी महापौर रशीद शेख यांनी मनपा आयुक्त कासार यांच्या कामकाजावर असमाधान व्यक्त करीत तसेच वॉटरग्रेसचा ठेका रद्द करावा या मागणीसाठी दोन वेळेस उपोषण आंदोलन केले होते. आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होत. कॉंग्रेसनेही आयुक्तांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कृषिमंत्री दादा भुसे यांच्या आदेशानंतर अविश्वास ठरावाच्या हालचाली थंडावल्या होत्या. आता जनता दल, महागठबंधन आघाडी अविश्वास ठराव आणण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे अविश्वासाच्या हालचाली गतिमान झाल्या असताना कासार हे ९ दिवसांच्या रजेवर गेले आहेत.
इन्फो
रजेचा वाढविला कालावधी
कासार यांनी आयुक्त पदाचा प्रभारी कार्यभार अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे सोपविण्याचे आदेश नगरविकास विभागाचे उपायुक्त शं. व्य. जाधव यांनी दिला आहे. आयुक्त कासार हे गेल्या सोमवारपासून आधीच रजेवर होते. आता त्यांनी रजेचा कालावधी संपण्याआधीच नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे दीर्घ काळासाठी रजेचा अर्ज केला होता. त्यांना नऊ दिवसांची रजा मंजूर करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.