मौजे सुकेणे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 07:02 PM2019-10-15T19:02:14+5:302019-10-15T19:02:38+5:30
कसबे सुकेणे : मविप्र संचलित के. आर. टी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मौजे सुकेणे विद्यालयात माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली.
कसबे सुकेणे : मविप्र संचलित के. आर. टी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मौजे सुकेणे विद्यालयात माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली.
प्रारंभी प्राचार्य आनंदा शिंदे, उपप्राचार्य वाल्मिक आहेर व पर्यवेक्षक सुनंदा नलावडे यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल भाऊसाहेब शिरसाट यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा उद्देश मनोगतातून व्यक्त केला. तर प्राचार्य शिंदे यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अनिल उगले यांनी तर आभार रामेश्वर धोंडे यांनी मानले.