मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचीटीम त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:56 PM2021-04-03T23:56:15+5:302021-04-04T00:29:28+5:30
त्र्यंबकेश्वर : शहरात तालुक्यापेक्षा जास्त कोव्हीडचे रुग्ण असुन त्र्यंबकेश्वर येथील रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने येथील आरोग्यसेवा एक प्रकारे कोलमडली आहे. आरोग्य विभागा व्यतिरिक्त नाशिक येथील मोतीवाला होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची टीम गेल्या तीन दिवसांपासुन त्र्यंबकमध्ये दाखल झाली आहे.

तीन दिवसांपासुन त्यांनी घरोघर जाऊन कोरोना विषयी लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करणे सुरु केले आहे. तसेच अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्याचे वाटप संपुर्ण त्र्यंबक नगरीत केले आहे.
कोव्हीडची लक्षणे, क्वॉरंटाईन काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबरोबरच इम्युनिटी बुस्टरचे काम करतात साबुदाणा सारख्या दिसणा-या या गोळ्यांची छोटी पाकीटे प्रत्येक कुटुंबात दोन याप्रमाणे वाटप करण्यात आली.
या गोळ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीस दररोज सकाळी उठल्या उठल्या चार गोळ्या तर लहान बालकास दररोज तीन दिवस दोन-दोन गोळ्या देण्याबाबत सुचना देण्यात येत आहे.
जुन २०२० पासुन आजपर्यंत त्र्यंबकेश्वरची जी कोव्हीड १९ रुग्ण नाशिकच्या मोतीवाला होमिओपॅथी रुग्णालयात दाखल केली होती. दरम्यान शनिवारपासुन सुमारे ४० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची टीम त्र्यंबकेश्वरच्या गल्ली बोळात ग्रामस्थांचेप्रबोधन करणे धीर देणे व गोळ्यांचे वाटप करण्यासाठी फिरत आहेत.
यासंबंधात त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजच्यावतीने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कार्यरत करण्यात आहे.
या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील यांनी कॅम्पचे नियोजन केले. यासाठी स्वप्निल शेलार, अमोल दोंदे व अन्य नगरसेवक उपस्थित होते.