बस-मोटरसायकल अपघात एक ठार तर दोघांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 09:42 PM2019-01-15T21:42:52+5:302019-01-15T21:44:50+5:30

उमराणे : येथुन जवळच असलेल्या देवळा -सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

A motorcycle accident killed one and both of them were critical | बस-मोटरसायकल अपघात एक ठार तर दोघांची प्रकृती गंभीर

बस-मोटरसायकल अपघात एक ठार तर दोघांची प्रकृती गंभीर

Next
ठळक मुद्देदेवळा-सौंदाणे रस्त्यावरील खारीपाडा फाट्यावर सायंकाळी घडली घटना

उमराणे : येथुन जवळच असलेल्या देवळा -सौंदाणे रस्त्यावरील खारीफाटा येथे बस व मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, सौंदाणे देवळा रस्त्यावरील खारीफाटा गावाजवळ देवळ्याहुन सौंदाण्याकडे भरघाव वेगाने जाणारी कळवण आगाराची कळवण मालेगाव (एम एच १४ बी टी ४५२९)ही बस व समोरु न सौंदाणे कडून हिरो डीलक्स (एम एच ४१ ए आर ७८८९) या मोटार सायकल यांच्यात जोरदार धडक होऊन भिषण अपघात घडला. यात मोटरसायकलस्वार राकेश सुरेश शिंदे (२३),अक्षय बाळू बोरसे (२१) व महेंद्र कैलास पवार (२१) तिघे राहणार मेशी ता.देवळा हे तिघे दवाखान्यातून परत येत असतांना समोरून येणार्या बसने तीव्र वळणावर मोटारसायकल स्वारांना जबर धडक दिल्याने यात महेंद्र पवार हा युवक जागीच ठार झाला. तर राकेश शिंदे व अक्षय बोरसे हे दोन्ही गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम उमराणे येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु जखमींची अवस्था बिकट असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांपैकी एकाची परिस्थिती गंभीर असून त्यास नाशिक येथे हलविण्यात आले आहे. तर मयत महेंद्र पवार यांचे मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान ऐन मकरसंक्र ांतीच्या सणाच्या दिवशीच हा अपघात झाल्याने गावातील नागरिकांची एकच धावपळ होत होती.
(फोटो १५ महेंद्र पवार)

 

Web Title: A motorcycle accident killed one and both of them were critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात