मोटरसायकली चोरीसत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 07:04 PM2019-03-23T19:04:11+5:302019-03-23T19:04:23+5:30

ताहाराबाद : गेल्या अनेक दिवसांपासून ताहाराबाद भागात वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरिंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या मोटारसायकल चोरिंना आळा बसविन्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसुन येत असल्याने नागरिकात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 The motorcycle stall started | मोटरसायकली चोरीसत्र सुरू

मोटरसायकली चोरीसत्र सुरू

Next
ठळक मुद्दे ग्रामस्थात याविषयी भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताहाराबाद : गेल्या अनेक दिवसांपासून ताहाराबाद भागात वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरिंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या मोटारसायकल चोरिंना आळा बसविन्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसुन येत असल्याने नागरिकात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताहाराबाद येथील विजय शांताराम गांगुर्डे यांची हिरोहोंडा स्पेल्डर (एम एच ४१ पी ५३७१) रात्रीच्या वेळी चोरीस गेली, तसेच न्युप्लाँट येथील शिक्षक केदार गंगाधर अहीरे यांची होंडा शाईन (एम एच ४१ वाय ७०३५) घरा बाहेरून रात्री चोरीस गेली, कांन्ती नगर येथील रविकांत साबळे यांची फॅशन प्रो (एम एच ४१ एएम ५१५५) चोरीस गेली. तसेच बसस्थानकातील कॅन्टीन चालक जितेंद्र रावल यांची हीरो होंडा एमएच १५ ए आर ९७८५ भर दिवसा हिरोहोंडा स्पेल्डर बसस्थानकातुन चोरीला गेली. मोटरसायकल चोर सीसीटीव्ही मध्ये दिसतोय, तरी पोलीसांना चोर हाती लागत नाही. किशोर नेरकर यांच्या दुकानासमोरु न भरदिवसा हीरो होंडा स्प्लेंडर चोरीला गेली आहे. दरम्यान पंधरा दिवसापुर्वी दसवेल येथील शेतकरी प्रदिप बोरसे यांच्या दोन मोटरसायकली अ‍ॅक्टीवा (एम एच ४१ ए आर २५७०) व फॅशन (एम एच ४१ ५९७७) घरा पासुन चोरी गेल्यात.
वाढत्या मोटर सायकल चोरी हा विषय अतिशय गंभीर बनला आहे, ग्रामस्थात याविषयी भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वाढत्या चोरी वर आळा बसविन्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

Web Title:  The motorcycle stall started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.