आयशरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 01:32 AM2021-07-10T01:32:27+5:302021-07-10T01:33:14+5:30

अंबड-सातपूर लिंक रोडवर अंबिका संकुलाजवळ पाठीमागून आलेल्या आयशरने मोटारसायकलला धक्का दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Motorcyclist killed in Eicher collision | आयशरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

आयशरच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

Next

सिडको : अंबड-सातपूर लिंक रोडवर अंबिका संकुलाजवळ पाठीमागून आलेल्या आयशरने मोटारसायकलला धक्का दिल्याने मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अंबड पोलिसांनी सांगितले की, योगेश रामचंद्र पवार व त्यांचे मित्र अंबड-सातपूर लिंक रोडवर गुरुवारी दुपारच्या सुमारास मोटारसायकलीने जात असताना अंबिका संकुलाजवळ महापालिकेच्या मैदानासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या आयशर हा ओव्हरटेक करून पुढे जात असताना पाठीमागून मोटारसायकलला धक्का लागला. यात योगेश पवार (रा. पंचवटी) हा आयशर गाडीच्या मागील बाजूच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Motorcyclist killed in Eicher collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.