महामार्गावरील पोलिसांच्या टोलवसुलीने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 04:23 PM2020-08-22T16:23:27+5:302020-08-22T16:24:34+5:30

ओझर : मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉर्इंट येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुरू असलेल्या पोलिसांच्या मानसिक त्रासाला वाहनधारक वैतागले आहे. येथून मनात येईल त्याला अडवून पावती फाड मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

Motorists suffer due to police toll collection on highways | महामार्गावरील पोलिसांच्या टोलवसुलीने वाहनधारक त्रस्त

शहर, ग्रामीण विभागात लागतेय वसुली स्पर्धा

Next
ठळक मुद्देशहर, ग्रामीण विभागात लागतेय वसुली स्पर्धा

ओझर : मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉर्इंट येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुरू असलेल्या पोलिसांच्या मानसिक त्रासाला वाहनधारक वैतागले आहे. येथून मनात येईल त्याला अडवून पावती फाड मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशन मध्ये सदर बाब उघडकीस आली आहे. कोरोनामध्ये झालेल्या लोकडाऊनमुळे महामार्गावर ओझर पासून पाच किलोमीटरवर चेक पोस्ट टाकण्यात आलेहोते. त्यावेळी असलेल्या नियमांना बॅरिकेड्स लावून अतिशय शिस्तीच्या चौकटीत बसवण्याचे काम तेथीलपोलिसांकडून केले जातहोते. लॉकडाऊनची शिथिलता जसजशी कमी होत गेली परराज्यात गेलेल्या जथ्यांची पोटवापसी होत असताना त्याला पूर्ण प्रवासात नेमके ओझरच्या डीआरडीओ जवळ ब्रेक लावून भुर्दंड हमी होत असल्याने स्थानिक व बाहेरील वाहनधारक पुरते त्रस्त झाले आहे. विशेष म्हणजे चालकाचे तोंड बघून वाहनात नियमाप्रमाणे व्यक्ती बसलेले असताना देखील वाहनांना चलन बोजा लावला जात आहे.दोन्ही बाजूला वेगात असलेले वाहनधारक कसे बसे ब्रेक लावत या वसुलीमुळे पुरते बेजार झाले आहे. दुचाकीवर जिल्हा वाहतूक शाखेतून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागाच्या वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर असताना ते वाºयावर सोडून केवळ कात्रीत पकडण्याचे काम सुरू असल्याने सामान्य वाहनधारक पुरता कचाट्यात सापडला आहे.यात महामार्गावर ओझर कोकणगाव मध्ये चेक पोस्ट दिलेली असताना या वसुली बाबत कुठलीही जाण नाही.त्यामुळे बाहेरील वाहनधारकला मार्ग विचारणं दंडात रूपांतरित होत असल्याने दोन्ही बाजूच्या वाहतूक शाखेत नेमके ताळमेळ आहे का असा सवाल नागरिक विचारू लागले आहे.
इन्फो...
गुरु वारी भारताचे एअरचीफ मार्शल हे ओझर येथे आलेहोते.त्यांना नाशिकला जायचे असताना त्यात ओझर येथे दोनच वाहतूक कर्मचारी असल्याने तेव्हा देखील अधीक्षक कार्यालयात असलेल्या वाहतूक शाखेला याची माहीत नव्हती.त्यामुळे कोकणगाव जवळील वाहतूक शाखेने वाहतूक पोलिस कर्मचाºयांनी वाहतूक नियमन करत त्यांना वाट मोकळी करून देत रस्ता दाखवला.
प्रतिक्रि या...
याप्रकरणी मी स्वत: लक्ष घालणार असून यात जिल्हा वाहतूक शाखेच्या नियमांबाहेर जाऊन कोणतेही कर्मचारी नियमबाह्य वसुली करत असल्यास आम्ही दखल घेऊन योग्य व कठोर कारवाही करणार आहोत.
-अनंत तारगे, पोलिस निरिक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, आडगाव.

फोटो२२ओझर१
मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे येथे सुरू असलेली पोलिसांची वसुली मोहीम.

Web Title: Motorists suffer due to police toll collection on highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.