खामखेडा येथील डोंगराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:18 PM2020-04-13T23:18:06+5:302020-04-13T23:18:34+5:30

देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बुटीच्या विहिरीजवळील जुना गावठाण परिसरातील डोंगरास सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. डोंगराचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले.

The mountain fire at Khamkheda | खामखेडा येथील डोंगराला आग

खामखेडा येथे बुटीच्या रानात लागलेली आग.

googlenewsNext
ठळक मुद्देसतर्कता : दोन तासांनंतर आग आटोक्यात

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील बुटीच्या विहिरीजवळील जुना गावठाण परिसरातील डोंगरास सोमवारी (दि. १३) दुपारी १ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. डोंगराचा बराच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले.
खामखेडा गावाच्या उत्तरेस असलेल्या मांगबारी घाट ते डांगसौंदाणे घाट अशी १३ ते १५ किलोमीटर संलग्न सह्याद्रीची सलग डोंगररांग आहे. या डोंगर रांगेवर पाण्याचे स्रोत, दाट झाडी असल्यामुळे या वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. याच डोंगराला अचानक आग लागली. आगीचे लोट जवळच राहणारे शेतकरी भाऊसाहेब शेवाळे, दीपक शेवाळे यांना दिसल्याने त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. देवळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत गावकºयांच्या मदतीने दोन तास शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी मोहिमेत वनपाल डी. पी. गवळी, वनरक्षक शांताराम आहेर, वनकमिटीचे अध्यक्ष दीपक मोरे, वनमजूर सुरेश डुकरे, कैलास गांगुर्डे, भाऊसाहेब शेवाळे, दीपक शेवाळे, बापू शेवाळे, गुलाब सोनवणे यांच्यासह गावकरी सहभागी झाले होते.

Web Title: The mountain fire at Khamkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.