डोंगरी देव उत्सवाला भाव भक्ती पूर्ण वातावरणात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 04:01 PM2019-12-08T16:01:32+5:302019-12-08T16:02:48+5:30
वणी- आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणुन परिचीत डोंगरी देव उत्सवाला भाव भक्ती पूर्ण वातावरणात प्रारंभ झाला असुन दत्तजयंतीला पौर्णिमेला या उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे
आहारामधे मक्याची कोंडी , राजिगरा, सुके डांगर बिगर तेलाची उिडद दाळ रात्री उडीद दाळ नागलीची व ज्वारीची भाकरी याचा समावेश असतो रात्री कांबळ अंथरून रग पांघरून डोगरी देव उत्सव स्थळ म्हणजेच मठ परिसरात निवारा करावा लागतो पहाटे थंड पाण्याने आंघोळ करून पूजाविधी करून गावातुन भिक्षा मागुन उदरभरण करण्यात येते डोंगरी देवाचे व्रत ठेवणार्यांना भाया संबोधण्यात येते त्यांना माऊल्या असेही म्हटले जाते पौर्णिमेच्या सांगतेच्या दिवशी पर्वतरांगातील गुहेमधे माऊल्या जातात तत्पूर्वी गुहेतील जागा स्वच्छ करून गाईच्या शेणाने सारवुन पूजाविधी करून तुपाचा दिवा लावण्यात येतो नागली, तांदुळ, गव्हाच्या पिठाचा दिवा याला पुंजा म्हणतात् फळांची मांडणी करण्यात येते दह्याच्या हंडीचे पूजन करण्यात येते. रात्रभर पूजाविधी आटोपुन उत्सवाची सांगता गुहेतुन बाहेर आल्यानंतर करण्यात येते दरम्यान व्रत कालावधीत घरी प्रवेश करता येत नाही शिव ओलांडता येत नाही उपवास ठेवावा लागतो भुतलाविरल वनस्पती, प्राणी जात यांचे संरक्षण संवर्धन व्हावे मानवजातीचे कल्याण व्हावे असा हेतु डोंगरी देवाचे पूजन करण्यामागे असल्याची माहिती देण्यात आली.