डोंगरी देवाचा उत्सव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 04:40 PM2019-12-08T16:40:22+5:302019-12-08T16:45:22+5:30

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात डोंगरी देवाचा कार्यक्र म सुरु असून श्रीदत्त जयंतीच्या पोर्णिमेपर्यत कार्यक्रम सुरू असून पांडाणे अंबानेर, पुणेगाव माळे दुमाला, पिंपरी अंचला व शेजारील गावामध्ये डोंगरी देवाचे भक्त गावात फेरी मारून गावातील आजारपण जावू दे, गुरा-ढोरात वाढ होवू दे कन्सरा माऊली असे गजर करत गावोगाव दुमदुमत गेले आहे.

The mountain started celebrating God | डोंगरी देवाचा उत्सव सुरु

अंबानेर ता दिंडोरी येथील डोंगरी देवाचे पांडाण्यातील पावरीच्या साह्याने प्रदर्शना करतांना भक्त छायाचित्रात दिसत आहेत.

Next
ठळक मुद्देपांडाणे : श्रीदत्त जयंतीच्या पोर्णिमेपर्यत सोहळा

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात डोंगरी देवाचा कार्यक्र म सुरु असून श्रीदत्त जयंतीच्या पोर्णिमेपर्यत कार्यक्रम सुरू असून पांडाणे अंबानेर, पुणेगाव माळे दुमाला, पिंपरी अंचला व शेजारील गावामध्ये डोंगरी देवाचे भक्त गावात फेरी मारून गावातील आजारपण जावू दे, गुरा-ढोरात वाढ होवू दे कन्सरा माऊली असे गजर करत गावोगाव दुमदुमत गेले आहे.
डोंगरी देवाची प्रथा उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींचे जीवन म्हणजे एक प्रकारची खडतर तपश्चर्याच आहे. जीवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत आलेल्या सामुदायिक उत्सवांना, व्रतांना जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे.
डोंगºयादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते.हे व्रत आदिवासींच्या विविध जमातीपैकी प्रामुख्याने कोकणा, कोकणी, महादेव कोळी, भिल्ल, वारली, पावरा, मावची आदी जमातीचे लोक मोठया प्रमाणात साजरा करतात.

या दिवशी मात्र सर्व महिला पहाटे नेहमी प्रमाने नदीवर जाऊन स्नान करतात. त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला कोरा शेल्याची (ऊपरण्याची) ओटी बांधली जाते. ओटीत डाळी पोहे, नारळ बांधतात. सर्व माऊल्या झुंज्यामुंज्यालाच गडावर चढून गौळाजवळ जातात. तेथे गौळाजवळ एक कोरा शेला आडवा बांधलेला असतो, तो ओलांडून सर्व माऊल्या ओटीतील डाळी पोहे वाहतात दर्शन घेतात आणि मनोभावे प्रार्थना करतात.
डोंगºयादेव हे व्रत सामुदायिकरित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण, पेठ, सुरगाणा, बागलाण, दिंडोरी, ईगतपूरी व त्र्यांबकेश्वर हे आदिवासी तालुके आहेत. या वर्षीही सर्वत्र डोंगºयादेव या व्रतसोहळ्यास नुकतीच सुरु वात झाली आहे.

 

Web Title: The mountain started celebrating God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.