मोराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 05:46 PM2018-10-31T17:46:23+5:302018-10-31T17:46:39+5:30

मालेगाव : तालुक्यातील येसगाव बुद्रुक परिसरात राष्टÑीय पक्षी मोराची शिकार करणाºया दोघा जणांना ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत. वन विभागाने दोघा शिकाºयांवर अटकेची कारवाई केली आहे.

Mourach killers arrested two | मोराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

मोराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

Next

मालेगाव : तालुक्यातील येसगाव बुद्रुक परिसरात राष्टÑीय पक्षी मोराची शिकार करणाºया दोघा जणांना ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत. वन विभागाने दोघा शिकाºयांवर अटकेची कारवाई केली आहे. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात येणारी छºयाची बंदुक, मृत मोर व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
तालुक्यातील येसगाव बुद्रुक परिसरात मंगळवारी सायंकाळी मुद्दस्सीर अहमद अकील अहमद (३४) रा. चुनाभट्टी,मालेगाव, अब्दुल अजीज अब्दुल खालीक (३३) रा. बजरंगवाडी मालेगाव हे दोघे बंदुकीच्या सहाय्याने मोराची शिकार करताना ग्रामस्थांना आढळून आले. संतप्त ग्रामस्थांनी दोघा शिकाºयांना पकडून ठेवले. यावेळी काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी येथील उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावार, तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, फिरते पथक वन परीक्षेत्र अधिकारी वसंत पाटील यांना दिली. वन विभागाचे तालुका वनपरीक्षेत्र अधिकारी कांबळे, वनपाल भानुदास सूर्यवंशी, ए. जे. पाटील, बी. एस. सूर्यवंशी, वैभव हिरे, एस. बी. शिर्के, डी. एम. देवकाते, ए. सी. ठाकरे, डी. आर. हिरे, टी. जी. देसाई आदि अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून मृत मोर, छºयाची बंदुक, दुचाकी (क्र. एम.एच.४१. ए. क्यु.४७५९) जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका वनअधिकारी व्ही. डी. कांबळे हे करीत आहेत. दरम्यान यापूर्वी देखील या संशयीतांनी शिकारीचे प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Mourach killers arrested two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.