लग्नघरी शोककळा! बहिणीचा विवाह २ दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 03:59 PM2022-05-21T15:59:41+5:302022-05-21T16:00:25+5:30

Accident Case : ट्रॅक्टर उलटून युवकाचा मृत्यू

Mourning at the wedding! Accidental death of only one brother while sister was getting married in 2 days | लग्नघरी शोककळा! बहिणीचा विवाह २ दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू 

लग्नघरी शोककळा! बहिणीचा विवाह २ दिवसांवर असताना एकुलत्या एक भावाचा अपघाती मृत्यू 

Next

सिन्नर (नाशिक) : बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असतांना एकुलत्या एक अठरा वर्षीय भावाचा अपघातीमृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे सिन्नर तालुक्यातील दातली येथे लग्नघरावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


अवघ्या दोन दिवसांवर कुटुंबातील मुलीचा विवाह असल्याने दातली येथील चांदोरे कुटुंबियांत आनंदाचे वातावरण होते.  तथापि, शुक्रवारी दुपारी  शेतात रोटावेटर मारून घरी परतत असताना ट्रॅक्टर वरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा फूट खोल गटारीत कोसळून उलटला. यात चालकाचा बाजूला बसलेला ओमकार चिंतामन चांदोरे (१८)  याचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यू झाला.


मयत ओमकार चांदोरे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार  विनोद इप्पर, सचिन काकड अधिक तपास करीत आहेत

 

Web Title: Mourning at the wedding! Accidental death of only one brother while sister was getting married in 2 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.