व्याख्याने, उद्घाटनाबरोबरच शोकसभा ‘आॅनलाइन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 01:07 AM2020-08-03T01:07:03+5:302020-08-03T01:08:33+5:30
कोरोनाच्या धास्तीमुळे एकत्र जमण्यावर निर्बंध आले असून उद्घाटन समारंभाबरोबरच श्रद्धांजलीचे कार्यक्रमही आता आॅनलाइन होऊ लागले आहे.
नाशिक : कोरोनाच्या धास्तीमुळे एकत्र जमण्यावर निर्बंध आले असून उद्घाटन समारंभाबरोबरच श्रद्धांजलीचे कार्यक्रमही आता आॅनलाइन होऊ लागले आहे.
विवाह सोहळ्यांपासून अंत्यसंस्कारापर्यंत लोकांच्या कमाल शासकीय स्तरावरून उपस्थिती निश्चित करून देण्यात आली आहे. अशा स्थितीत कार्यालयीन बैठकांपासून चर्चासत्र, व्याख्याने, उद्घाटन समारंभ एवढेच नव्हे तर शोकसभांसारखे श्रद्धांजली कार्यक्रमसुद्धा ‘आॅनलाइन’ पद्धतीने सुरू असल्याचे दिसते. प्रत्यक्षपणे एकत्र न येता विविध विषयांवरील कार्यक्रम आॅनलाइनपद्धतीने लाइव्ह घेतले जात आहेत.
४शहरातील मंगेश मिठाईचे संचालक दिनेश अग्रवाल यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांचा श्रद्धांजलीचा कार्यक्रमही आॅनलाइन घेत गर्दी टाळून सुरक्षित राहण्याचा संदेश दिला.
४शहरातील डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला तसेच स्वर्गीय पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानमालेचे पुष्प अशाच पद्धतीने आॅनलाइन गुंफण्यात आले.
४काही दिवसांपूर्वीच देशातील पहिल्या ‘ई-कोर्ट’चे जिल्हा व सत्र न्यायालयात आॅनलाइन उद्घाटन करण्यात आले.
४कोरोनामुळे नवीन जीवनशैली विकसीत होताना या कार्यक्रमांमधून दिसते.