पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:21 PM2019-12-29T22:21:32+5:302019-12-29T22:24:03+5:30

खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या.

Mourning in Panchavati: Councilor Shantabai Diamonds terminates life | पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास

पंचवटीत शोककळा : नगरसेविका शांताबाई हिरे यांनी संपविला जीवनप्रवास

Next
ठळक मुद्देआजारपणाला कंटाळून काहीतरी विषारी औषध प्राशन मनपा अग्निशमन दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना

नाशिक : अत्यंत साधा स्वभाव, पण आपल्या कणखर आवाजात प्रभागातील नागरी समस्या तितक्याच पोटतिडकीने महापालिकेच्या सभागृहात मांडणाऱ्या ६१ वर्षीय शांताबाई बाळू हिरे (रा.राहुलवाडी, पेठरोड) यांनी आपल्या राहत्या घरी रविवारी (दि.२९) दुपारी आजारपणाला कंटाळून काहीतरी विषारी औषध प्राशन करून आपला जीवनप्रवास संपविला. त्यांच्या निधनाची बातमी पंचवटी प्रभाग क्रमांक ४मध्ये पसरताच नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हिरे या मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना आठवडाभरापूर्वीच एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. रविवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी घराची दारे, खिडक्या बंद करून घेत काहीतरी विषारी औषध सेवन केले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास जेव्हा त्यांचे नातेवाईक घरी आले तेव्हा घराचा दरवाजा आतमधून हिरे उघडत नव्हत्या. खुपदा दार वाजविले, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या राहत्या घरावर मुलगा चढला अणि वरून जेव्हा त्याने घरात प्रवेश केला तेव्हा हिरे या बेशुद्धावस्थेत आढळल्या. मुलाने तत्काळ दरवाजा उघडून हिरे यांना उचलून रुग्णालयात नातेवाइकांच्या मदतीने हलविले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. हिरे यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे, असा परिवार आहे. २०१७साली हिरे या भाजपाच्या तिकिटावर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. मागील दोन ते अडीच वर्षांपासून हिरे या पंचवटीच्या प्रभाग-४चे प्रतिनिधित्व करत होत्या. प्रभागातील समस्यांबाबत त्या नेहमीच जागरूक राहत होत्या. मनपाच्या सभागृहात त्या आपल्या साध्यासोप्या पद्धतीने नैसर्गिकरीत्या समस्यांची मांडणी करत लक्ष वेधून घेत होत्या. त्यांच्या अशा अचानकपणे झालेल्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा रात्री साडेनऊ वाजता पंचवटी अमरधाममध्ये पोहोचली. यावेळी मनपा अग्निशमन दलाच्या वतीने पंचवटी अग्निशमन उपकेंद्रप्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करत मानवंदना दिली. शोकाकुल वातावरणात हिरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Mourning in Panchavati: Councilor Shantabai Diamonds terminates life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.