डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर चांदवडला स्थलांतरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:58 PM2020-05-25T20:58:07+5:302020-05-26T00:07:01+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील कोरोना संशयित रु ग्णांसाठी डांगसौंदाणे येथील ग्रामीण रु ग्णालयात निर्माण केलेले कोव्हिड हेल्थ सेंटर चांदवड येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.आता बागलाण, देवळा व चांदवड या तिन्ही तालुक्यांसाठी चांदवड येथील नेमिनाथ जेन फार्मसी महाविद्यालयात हेकोव्हिडं हेल्थ सेंटर चालणार आहे तर बागलाण सह देवळा तालुक्यातील जनतेला आता चांदवड वर अवलंबून राहावे लागणार आहे.

डांगसौंदाणे ग्रामीण रु ग्णालय प्रशासनाने तालुक्यातील कोव्हिड हेल्थ सेंटर म्हणून ताब्यात घेतल्यानंतर या भागातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. तर या कोविड सेंटर मुळे आदिवासी भागातील आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम झाला होता.
याबाबत परिसरातील आदिवासी जनतेने प्रशासनाला विरोध करीत तालुक्यातील
कोरोना संशयित व बाधित रूग्ण येथे दाखल करण्यास विरोधही केला होता. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनानेही जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले होते.
-----------------------------------
सटाणा व देवळा या दोनाही तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या नगण्य असून संशयित रूग्णांच्या स्वॅबचे प्रमाणही कमी आहे. तरीही प्रशासनाला मनुष्यबळाचा वापर मोठया प्रमाणात करावा लागत असल्याने सटाणा येथील कोव्हीड व डी डी एच सेंटर चांडवड येथे हलविण्यात आले आहे. चांदवड येथे सटाणा व देवळा मिळून चक्र ाकार पध्दतीने आरोग्य कर्मचारी पुरविण्यात येणार आहेत.
- डॉ. बांगर, नोडल आॅफिसर, बागलाण
------------------------------------
डांगसौंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरमुळे परिसरात भीती व संशयाचे वातावरण पसरले होते. म्हणून ते इतरत्र हलविण्याची मागणी आदिवासी जनतेने सुरु वातीपासूनच केली होती. हे सेंटर हलविण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न करावे लागले. त्यात यश आल्याने समाधानी आहे.
- दिलीप बोरसे, आमदार बागलाण