शेतकरी संघटनेचे निफाडला धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:13 AM2019-12-13T00:13:49+5:302019-12-13T00:30:59+5:30
शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
निफाड : शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. छावा, क्रांतिवीर सेना, मनसे, प्रहार संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला. तहसीलदार दीपक पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शंकर पूरकर, भीमा कोटकर, भीमराव बोराडे, शिवराम कोल्हे, विष्णुपंत ताकाटे, अशोक भंडारे, छावा क्रांतिवीर सेनेचे शिवाजी मोरे, मनसेचे प्रकाश गोसावी, प्रहार संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष जगन काकडे, अंजना बोराडे, कमल बोराडे, विमल पूरकर, सुमन पूरकर, सुवर्णा जाधव, सुमन जाधव, विमल चव्हाण आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
..या आहेत मागण्या
निवेदनात सरकार शेतमाल
आयात करीत असल्याने दर मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, शेती तोट्यात गेल्याने आत्महत्या करीत आहेत. हे थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, एचटीबीटी बियाणावरील बंदी उठवावी, व्यापाºयाकडील शेतमाल साठवण बंदी उठवावी, शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.