इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:47 PM2018-10-12T22:47:51+5:302018-10-12T22:48:07+5:30
पेट्रोल, डिझेल, गॅसदर वाढीविरोधात भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोलपंपासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी करून आपला रोश व्यक्त केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज इंधन दरवाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पेट्रोल, डिझेल, गॅसदर वाढीविरोधात भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरातील पेट्रोलपंपासमोर सरकारविरोधी घोषणाबाजी करून आपला रोश व्यक्त केला.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दररोज इंधन दरवाढ होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. हा प्रकार जनतेच्या पुढे आणण्यासाठी भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राकेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात महिला भंडारा जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष आवेश पटेल, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकपूर राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे उपस्थित होते. यावेळी पेट्रोलपंपासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटी करप्रणाली आणल्यास २० ते २५ रूपये प्रती लिटर दर कमी होती आणि सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, असे यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश पडोळे, सुलभा हटवार, विशाल भोयर, भंडारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भूषण टेंभूर्णे, साकोली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विष्णू रणदिवे, तुमसर विधानसभा अध्यक्ष प्रफूल बिसने, कैलास मते, प्रकाश करंजेकर, भारती निमजे, आशा गिरीपुंजे, भुपेंद्र साठवणे, प्रकाश देशमुख, स्वप्नील भिंगरी, धम्मदिप रंगारी, सागर भुरे, सुरेश तितीरमारे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विवेक हटवार, संदीप निमजे, राजू थोटे, हेमंत समरीत, अयुब पटेल, आशिष भानारकर, शैलेश वैद्य, बंडू लांबट, सचिन मेश्राम, लक्ष्मण सेलोटे, रूपेश कुंभरे, सुधीर राऊत, मोहन परशुरामकर, सुरज चचाणे, गौतम सुखदेवे, आशिष भोंगाडे यांनी सहकार्य केले.