करवाढीविरोधात मनविसेचे नाशिक महापालिका आवारात क्रीकेट खेळून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:38 PM2018-04-16T15:38:59+5:302018-04-16T15:38:59+5:30
नाशिक : महापालिके ने केलेली करवाढ आवाजवी असल्याचा अरोप करीत महापालिकेच्या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निषेध केला आहे. तसेच महापालिकेच्या करवाढीच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सोमवारी (दि.16) महापालिकेच्या मुख्यालयाच्या आवारात समोर क्रिकेट खेळून आंदोलन केले.

महापालिकेने घेतलेल्या करवाढीच्या निर्णयाचा शहरातील महाविद्यालये, मराठी शाळांच्या क्र ीडागांनाना याचा फटका बसून ही आवाजावी करवाढीचा बोजा हा शाळा महाविद्यालयावर पडून परिणामी पालक व विद्यार्थी यांच्यावर हा बोजा पडणार आहे. याचा निषेध म्हणून शहरातील महाविद्यालय व शाळा यांचे क्र ीडांगण वाचावे म्हणून महाराष्ट्र नविनर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नाशिक मनपा मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे क्र ीडागंण वाचावे, म्हणून क्रि केट खेळत या दरवाढीचा निषेध केला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनविसे शहाराध्यक्ष शाम गोहाड, जिल्हाध्यक्ष दीपक चव्हाण, शशिकांत चौधरी, सौरभ सोनवणो, राहुल क्षीरसागर,अमर जमधडे, स्वप्नील ओढाणो,संदीप पैठणपगार,सुयश मंत्री, प्रसाद घुमरे, प्रशांत बारगळ, सुयश पगारे, सूरज डबाळे, हर्षल ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिथ होते.