वारसा हक्क नोकरीसाठी आझाद मैदानात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 01:46 AM2021-12-25T01:46:46+5:302021-12-25T01:47:05+5:30
राज्यातील महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि वारसा नोकरीची संधी देताना जातीचा निकष लावला जात असल्याने इतर संवर्गातील कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनादेखील स्वच्छता कर्मचारी म्हणूनच सेवा मिळाव्यात, या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
ref='https://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक : राज्यातील महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती आणि वारसा नोकरीची संधी देताना जातीचा निकष लावला जात असल्याने इतर संवर्गातील कर्मचारी या सुविधांपासून वंचित आहेत. त्यांनादेखील स्वच्छता कर्मचारी म्हणूनच सेवा मिळाव्यात, या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत शासनाकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारसा हक्क संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून मुंबईत या मुद्द्यावर आंदोलन सुरू करण्यात आले असून, नाशिकमधून किमान २०० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. समितीच्या नेत्या तथा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक असलेल्या खुशबू चौधरी या आंदोलनाचे नेतृत्व करीत असून, त्यांनी या प्रकरणी समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, लाड पागे शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरी यापूर्वी मिळत हाेती. परंतु ११ मार्च २०१६ नुसार फक्त अनुसूचित जाती जमाती वर्गातील कामगारांच्या वारसांनाच न्याय दिला जातो. ओबीसी, भटक्या जमाती यांना मात्र न्याय मिळत नाही. जातीनिहाय विचार न करता सफाई कर्मचारी म्हणून वारसा हक्क मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.--कोट-- लेखी नसल्याने आंदोलन सुरूचवारसा हक्काच्या मागणीसाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना निवेदन देण्यात आल्यानंतर त्यांनी दोन आठवड्यांत याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र याबाबतचे लेखी मिळणे अपेक्षित असून, लेखी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही. - खुशबू चौधरी, अध्यक्ष, वारसा हक्क संघटना समन्वय समिती.