कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:54 AM2018-07-16T00:54:03+5:302018-07-16T00:54:44+5:30
देवळाली कॅम्प : देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या हालचाली होत असल्याच्या वृत्तामुळे देवळालीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अस्तित्वाविषयी चर्चेला उधाण आले आहे. अद्यापही राज्य शासनाच्या विविध योजना राबविताना प्रशासकीय पातळीवर अनास्था कायम असताना कॅन्टोन्मेन्ट बोर्ड बंद करण्याची भूमिका कितपत योग्य ठरेल, अशी चर्चा होताना दिसत आहे.

ब्रिटिशांनी लष्करी जवानांची सोय व्हावी या उद्देशाने कॅन्टोन्मेंटची स्थापना केली होती. शंभर वर्षांमध्ये नागरीकरणाचा वाढत्या पसाऱ्यामुळे लष्करी केंद्रापेक्षा नागरी भाग वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लष्करी भागातील रस्ते स्थानिक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहमतीशिवाय वाहतुकीस बंद न करण्याच्या निर्णयामुळे शासकीय बाबूशाहीला फटका असल्याचे मानले जात होते. त्याच अधिकारी वर्गाने देशभरातील कॅन्टोन्मेंट बंद करण्याचा प्रस्ताव लष्करप्रमुखांच्या माध्यमातून नव्याने करून आणला असल्याचीच चर्चा रविवारी सुरू होती. नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या याबाबत संमिश्र प्रतिक्रिया असून, ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका सर्वांची दिसत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आमदार व राज्य शासनाचा निधी वापरण्याबाबतचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. अद्यापही राज्य शासनाच्या विविध योजना राबविताना शासकीय पातळीवर अनास्था कायम असताना कॅन्टोन्मेन्ट बोर्ड बंद करण्याची भूमिका कितपत योग्य ठरेल, हे येणाºया काळातच ठरविणार असले तरी त्या माध्यमातून एफएसआय वाढीचा मात्र निकाल लागणार आहे.