संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:56 PM2018-12-01T22:56:50+5:302018-12-01T23:04:02+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.
आंदोलनात सहभागी झालेले येवला तालुक्यातील संगणक परिचालक.
मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.
अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधान परिषदेत याप्रश्नी आवाज उठविला असता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सारवासारव करीत संगणक परिचालकांना वर्षाला ६० ते ७० हजार रुपये मिळत असल्याची माहिती मांडली. पंकजा मुंडे यांनी दिलेले उत्तर खोटे असून, संगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती संगणक परिचालक राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आझाद मैदानात येऊन संगणक परिचालकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन तसेच सर्व शिवसेना आमदार संगणक परिचालकांच्या मागण्या विधानसभेत मांडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संगणक परिचालक मोर्चात सहभागी होत कंपनी मनमानी कारभार करीत असून, संगणक परिचालक अनेक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून त्यांच्या मागण्या राज्य शासनाने तत्काळ लागू करण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. यावेळी संगणक परिचालक राज्याचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. येवला तालुक्यातील ७० हून अधिक तसेच राज्यातील हजारो संगणक परिचालक आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.संगणक परिचालकांना आयटी महामंडळात समाविष्ट करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निर्णय असून, आपले सरकार सेवा केंद्रात नवीन प्रकल्प सुरू करणार असून, संगणक परिचालकांनी या सेवातून मोबदला घ्यावा, अशी माहिती अधिवेशनात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.