सिन्नरला संगणक परिचालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:06+5:302021-02-05T05:49:06+5:30

सिन्नर : राज्यातील संगणक परिचालकांचा महाराष्ट्र आयटी महामंडळात समावेश करण्याऐवजी आपले सरकार सेवा प्रकल्पाचे काम एका कंपनीला देण्यात ...

The movement of computer operators to Sinnar | सिन्नरला संगणक परिचालकांचे आंदोलन

सिन्नरला संगणक परिचालकांचे आंदोलन

Next

सिन्नर : राज्यातील संगणक परिचालकांचा महाराष्ट्र आयटी महामंडळात समावेश करण्याऐवजी आपले सरकार सेवा प्रकल्पाचे काम एका कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करीत, तसेच मानधनात केवळ १ हजार रुपये मानधन वाढ देऊन सरकारने संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याबद्दल रोष व्यक्त करीत संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांनी शासन निर्णयाच्या विरोधात घोषणा देऊन शासन निर्णयाची होळी केली. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या वतीने पोलीस हवालदार अंकुश दराडे यांनी निवेदन स्वीकारले. आंदोलनात पूजा गलांडे, ज्योती सहाणे, जयश्री तोटे, मंजूषा घनदाट यांच्यासह सुमारे ४० संगणक परिचालक सहभागी झाले. समान काम-समान वेतन या तत्त्वावर परिचालकांना वेतन मिळणे आवश्यक होते, तसेच भ्रष्टाचारी कंपनीला काम देऊ नये, अशी मागणी संघटनेने पत्रव्यवहाराद्वारे केलेली होती. तरीही शासनाने पुन्हा संबंधित कंपनीला काम देऊन संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

--------------

सिन्नर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करताना तालुक्यातील संगणक परिचालक. (०३ सिन्नर १)

===Photopath===

030221\03nsk_14_03022021_13.jpg

===Caption===

०३ सिन्नर १

Web Title: The movement of computer operators to Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.