निर्बंध शिथिल झाल्यानंतर कॉँग्रेसचे आंदोलन

By admin | Published: January 5, 2017 02:02 AM2017-01-05T02:02:40+5:302017-01-05T02:02:56+5:30

नोटाबंदी : गुजरातहून खास निरीक्षक दाखल

The movement of the Congress after the relaxation was relaxed | निर्बंध शिथिल झाल्यानंतर कॉँग्रेसचे आंदोलन

निर्बंध शिथिल झाल्यानंतर कॉँग्रेसचे आंदोलन

Next

नाशिक : नोटाबंदीनंतरच्या आर्थिक निर्बंधांसाठी दिलेल्या पन्नास दिवसांची मुदत संपल्यानंतर आता कॉँग्रेसला जाग आली असून, आंदोलन जोरात झाले पाहिजे, यासाठी खास निरीक्षक पाठविण्यात आले आहेत. या आंदोलनाचा अहवाल राष्ट्रीय नेत्यांकडे पाठविला जाणार असल्याने कॉँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर बॅँका आणि एटीएममधून रोकड काढण्यावर निर्बंध घातले होते. पन्नास दिवस हे निर्बंध राहतील असे जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, नोटाबंदीनंतर बॅँकात खाते असलेल्या आणि एटीएम कार्ड असलेल्या खातेदारांपेक्षा बॅँकेत खाते नसलेल्या तळागाळातील वर्गाचे खूप हाल झाले. ग्रामीण भागातील बॅँकांपर्यंत रोकड न आल्याने तेथील अर्थव्यवस्थेवरही प्रतिकूल परिणाम झाला. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, आता कॉँग्रेसने आंदोलनाची घोषणा केली आहे. कॉँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ६ जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे आणि रविवारी म्हणजेच ८ तारखेला घंटानाद आंदोलन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून गुजरात येथील डॉ. कमलेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी बुधवारी सकाळी कॉँग्रेस भवनात बैठक घेतली. त्यानंतर आता कॉँग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी यापूर्वी एक मोर्चा काढला होता. त्यात विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यात यश आले नव्हते. त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा आंदोलन करावे लागणार असून, त्यामुळेच कार्यकर्ते कामाला
लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The movement of the Congress after the relaxation was relaxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.