ब्राह्मणगावी कंत्राटी आरोग्य सेवकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 09:51 PM2020-06-22T21:51:11+5:302020-06-22T23:02:34+5:30
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव यांना निवेदन दिले.
कंत्राटी आरोग्य सेवक नियमित आरोग्यसेवेत समायोजनाकरिता गेल्या १५ वर्षांपासून मागणी करत आहेत. यासाठी वेळोवेळी आंदोलने करूनही शासनाने दखल घेतली नाही. कोरोना काळातही या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. मात्र शासन दखल घेत नसल्याने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
याप्रसंगी किरण शेवाळे, पंकज मोहांकर, राहुल पवार, मनाली हिरे, रूपाली वाघ, सोनाली वाघ, माधुरी आहेर, क्षमा शेट्टी, वैशाली शिरोळे आदी उपस्थित होते.