संभाजी ब्रिगेडतर्फे कांदे वाटप करून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:59 AM2018-12-29T00:59:38+5:302018-12-29T01:00:08+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी (दि.२८) मेनरोड परिसरात मोफत कांदा वाटप करण्यात आले.
नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, परंतु केंद्र व राज्य सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी (दि.२८) मेनरोड परिसरात मोफत कांदा वाटप करण्यात आले. संभाजी ब्रिगेडतर्फे ‘मोदी, फडणवीस होश में आओ होश में आओ, होश में आके बात करो’, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे,‘ जागे व्हा, ‘जागे व्हा, मोदी सरकार जागे व्हा’, अशा घोषणा देत राज्य व केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी उपस्थिताना संभाजी ब्रिगेडतर्फे कांद्याचे मोफत वाटही करण्यात आले. आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना कांदा भेट देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शेतकºयांचा कांदा पोहचविण्याची मागणी केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोठे, कार्याध्यक्ष अजय मराठे, विकी गायधनी, सचिन घोलप, विजय बडे, मंगेश बडे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.