जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:56 AM2018-05-29T00:56:53+5:302018-05-29T00:56:53+5:30

नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवसा होणाऱ्या विविध आंदोलनामुळे मेटाकुटीस आलेल्या पोलीस यंत्रणेने आता यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाने वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे सांगून आंदोलकांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकायांना सादर केला आहे.

 Movement of District Collector's Offices? | जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी?

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनांना बंदी?

Next

नाशिक : नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरदिवसा होणाऱ्या विविध आंदोलनामुळे मेटाकुटीस आलेल्या पोलीस यंत्रणेने आता यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनाने वाहतुकीची कोंडी होणार असल्याचे सांगून आंदोलकांना पर्यायी जागा देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकायांना सादर केला आहे. रस्त्याच्या कामानिमित्ताने आता आंदोलनांना याठिकाणी कायमची बंदी घालण्यात येणार असून, त्यासाठी गोल्फ क्लब मैदानाचा पर्याय पुढे आणला जात आहे.  राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत दररोज अनेक आंदोलने केली जातात. सरकार दरबारी मंत्रालयात आपला आवाज पोहोचावा असा हेतू आंदोलनकर्त्यांना असला तरी, मंत्रालयासमोरील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सर्व प्रकारचे आंदोलने, धरणे, निदर्शने आझाद मैदानावर केले जातात व आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख पदाधिकाºयांना आपल्या भावना मांडण्यासाठी मंत्रालयापर्यंत जाण्याची परवानगी पोलिसांकडून देण्यात येते. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरदेखील काहीशी अशीच परिस्थिती असून, दरदिवसा धरणे, निदर्शने, मोर्चा, उपोषणांमुळे जुने मध्यवर्ती बसस्थानक ते मेहेर चौक या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. कधी कधी आंदोलकांकडून थेट रस्त्यावरच रास्ता रोको केला जात असल्याने तर या मार्गावरील दुतर्फा वाहतूक खंडित होते, परिणामी या आंदोलनांमुळे शहराच्या अन्य रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडून तेथेही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना धावाधाव करावी लागते.  आता तर महापालिकेच्या वतीने अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यान स्मार्ट रस्त्याचे काम सुरू केले जात असून, तीन महिन्यांसाठी हा रस्ता टप्पाटप्प्याने वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. या मार्गावर एकेरी लेनमधून दुहेरी वाहतूक वळविण्यात येणार असून, त्यातच जर दररोजचे आंदोलने झाली तर कामाचा खोळंबा होण्याबरोबरच वाहतुकीची वाट लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही प्रकारचे आंदोलने होऊ नये अशा विचाराप्रत पोलीस यंत्रणा आली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी मोकळ्या ठिकाणी मोर्चे, निदर्शने, आंदोलन करण्यासाठी पर्यायी जागा जिल्हाधिकाºयांनी सुचवावी तसेच कार्यालयासमोर आंदोलनाला अनुमती न देण्याचा प्रस्तावच पोलिसांनी सादर केला आहे. या संदर्भात  पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे.
शिवाजी मैदान की गोल्फ क्लब?
पोलिसांनी आंदोलनाची जागा बदलण्यासाठी दिलेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकाºयांना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. मंगळवारपासून अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या रस्त्यावरील शासकीय कन्या शाळेकडील बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असून, याच रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेल्या महिन्यापासून आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाºयांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी त्यांना दूर करावे लागणार आहे. वाढते आंदोलने व जागेचा विचार करता आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी मैदान किंवा थेट गोल्फ क्लब मैदानावरच यापुढे आंदोलनांना परवानगी द्यावी लागणार आहे.

Web Title:  Movement of District Collector's Offices?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.