'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

By संजय पाठक | Published: April 7, 2023 11:11 AM2023-04-07T11:11:17+5:302023-04-07T11:13:33+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महानगर प्रभारी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार आहेत

Movement for the post of city president of BJP in Nashik has increased | 'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

'जुन्यांना बंदी नव्यांना संधी'; नाशिक भाजपाचा उपक्रम, शहराध्यक्ष पदासाठी हालचाली जोरात

googlenewsNext

नाशिक- भाजपाच्या शहराध्यक्षपदासाठी हालचाली गतिमान झाल्या असून येत्या रविवारी( दि 9) पक्षाचे नेते इच्छुकांची मते जाणून घेणार आहेत या पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी जुन्या आणि माजी शहराध्यक्षांना मात्र मनाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

शहराध्यक्षपदासाठी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात येणार असून त्यासाठी रविवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे महानगर प्रभारी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये येणार आहेत. शहराध्यक्षपदासाठी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, माजी गटनेते जगदीश पाटील, हिमगौरी आडके आदी दावेदार आहेत तर सध्या संघटनेतील विविध पदे भूषवणारे सुनील केदार, नाना शिलेदार प्रशांत जाधव, अनिल भालेराव गणेश कांबळे, ऍड. अजिंक्य साने हे प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Movement for the post of city president of BJP in Nashik has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.