एचएएल कामगारांचे आंदोलन तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 05:37 PM2019-06-28T17:37:45+5:302019-06-28T17:37:59+5:30
ओझर: हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या कामगार वर्गाचा वेतनकरार जवळपास ३०महिन्यांपासून प्रलंबित आहे.
ओझर: हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या कामगार वर्गाचा वेतनकरार जवळपास ३०महिन्यांपासून प्रलंबित आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया को-आॅर्डिनेशन कमिटीने दि.२५ जून पासून देश पातळीवर साखळी उपोषण सुरु केले आहे.नाशिक येथील संघटनाही को-आॅर्डिनेशन कमिटीच्या सोबत ठामपणे आंदोलन करत आहे. केवळ व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण या चिघळलेल्या परिस्थितिस कारणीभुत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.
अधिकारी वर्गाच्या तुलनेत सापत्न वागणूक देत तुटपूंजी वाढ देत असल्याने देशभरातील वीस हजार कामगार वर्गात व्यवस्थापनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर शुक्र वारी सकाळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .एक जानेवारी २०१७ च्या वाढीव वेतन कराराचे लाभ
अधिकारी वर्गाला मिळत असून आस्थापनाचे आधारस्तंभ असलेल्या कामगारांची मात्र व्यवस्थापन चेष्टा करत आहे.
निष्पक्ष आणि रास्त आणि विनाविलंब वेतन करार ही सर्व भारतातील संघटनांची रास्त मागणी आहे.
कामगार वर्ग हा कुठल्याही आस्थापनेचा मूळ पाया असतो त्याचीच गळचेपी करण्याचा प्रकार व्यवस्थापन करत असल्याची भावना आहे. केवळ एचएएल कामगारांचे वेतनमान न वाढल्याने कामगार वर्गात असंतोष पसरत आहे. त्याचा उद्रेक होण्यापर्यन्त परिस्थिती चिघळवू पाहत आहे.
आस्थापनेची आर्थिक स्तिथि चांगली असून अधिकारी वर्गास भरघोस वाढ देणारे व्यवस्थापन कामगार वर्गाला अतिशय तूटपूंजी वाढ देवून सापत्न वागणूक देत आहे.
देशभरातील सर्व प्रभागांमध्ये याचा निषेध म्हणून साखळी उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे.