रेल्वे रुग्णालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:36 PM2020-02-12T23:36:47+5:302020-02-12T23:48:36+5:30

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सेवेत असलेल्या रुग्णालयामध्ये सध्या सुविधांचा अभाव आहे. किरकोळ आजारांसाठीही येथे औषधे उपलब्ध होत नाहीत. रेल्वे रु ग्णालयात तत्काळ अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने बुधवारी (दि.१२) धरणे आंदोलन करण्यात आले.

Movement to hold in front of a train hospital | रेल्वे रुग्णालयासमोर धरणे आंदोलन

मनमाड येथे रेल्वे रुग्णालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झालेले नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सदस्य.

Next
ठळक मुद्देमनमाड : असुविधांबाबत तक्रार

मनमाड: येथे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सेवेत असलेल्या रुग्णालयामध्ये सध्या सुविधांचा अभाव आहे. किरकोळ आजारांसाठीही येथे औषधे उपलब्ध होत नाहीत. रेल्वे रु ग्णालयात तत्काळ अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने बुधवारी (दि.१२) धरणे आंदोलन करण्यात आले.
या रु ग्णालयामध्ये रक्त-लघवी तपासणी असलेली लॅब बंद आहे. एक्स-रे मशीन आणि टेक्निशियन उपलब्ध नाही. या रु ग्णालयाने एका खासगी रु ग्णालयासोबत टायअप केले असून, तेथेदेखील कर्मचाऱ्यांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. या सर्व गोष्टींची रेल्वे प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, रु ग्णालयात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रु ग्णालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. यावेळी कर्मचाºयांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा युनियनने दिला. आंदोलनात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सर्व रेल्वे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Movement to hold in front of a train hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.