मनमाडला धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:52 PM2020-01-08T22:52:39+5:302020-01-08T22:52:51+5:30

मोदी सरकारच्या कामगार, शेतकरी व कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी मनमाड पालिकेतील सिटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशव्यापी संपात सहभाग घेण्यात आला.

Movement to hold Manmad | मनमाडला धरणे आंदोलन

मनमाडला धरणे आंदोलन

Next


मनमाड येथे सिटू संघटनेच्या धरणे आंदोलनप्रसंगी बोलताना सचिव रामदास पगारे. समवेत गंगाभाऊ त्रिभुवन, किशोर अहिरे, जॉनी जॉर्ज, विकास गायकवाड.

मनमाड : मोदी सरकारच्या कामगार, शेतकरी व कष्टकरी जनतेचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या खासगीकरणाच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी मनमाड पालिकेतील सिटू संलग्न महाराष्ट्र नगर परिषद कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून देशव्यापी संपात सहभाग घेण्यात आला.
मनमाड पालिकेतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालिकेतील २१ मयत कामगारांच्या वारसांना वेळोवेळी मागणी करूनही सेवेत घेण्यात आलेले नाही. त्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे. पालिकेतील वर्ग ३ व ४च्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तरी या कर्मचाºयांना लाभ देण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम कायम व सेवानिवृत्त कामगारांना देण्यात यावी, सफाई कामगार गेल्या वीस वर्षांपासून राहात असलेली घरे त्यांच्या नावावर करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन मंडल अधिकाºयांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष किशोर अहिरे, कार्याध्यक्ष जॉनी जॉर्ज,
सचिव रामदास पगारे, विकास गायकवाड, सुभाष केदारे, सागर अहिरे, असलम शेख, अरुण दरगुडे, अमित देवळे, अनिल अहिरे, मनोज
फटांगळे, संगीता निकाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Movement to hold Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.