नदीजोड प्रकल्पात नांदगावचा समावेश करण्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:57 PM2019-06-27T21:57:54+5:302019-06-27T21:58:58+5:30
नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी (दि.२७) नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.
नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी (दि.२७) नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रि य राहिले असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला. यावेळी प्रशासनाने योग्य दाखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
निवासी नायब तहसीलदार आर एम मरकड यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. अशोक परदेशी, विशाल वडघुले, योगेश सोनार, परशराम शिंदे, नवनाथ साळुंके, निवृत्ती खालकर, निलेश चव्हाण, दिलीप निकम, शिवाजी जाधव, सुमित सोनवणे, रणजित आहिरे, भाऊसाहेब सरोदे, वसंत मोरे इत्यादी या आंदोलनात सहभागी झाले होते.
नार-पार जलहक्क समिती, मनमाड बचाव कृती समिती, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आप पार्टी, युवा फाउंडेशन, भारिप, कोळी महासंघ इत्यादी पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.