मालेगावी वीज कर्मचारी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:57 AM2018-02-13T00:57:27+5:302018-02-13T01:00:02+5:30

मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनांचे एक दिवसाआड आंदोलन सुरू असून, सोमवारी वीज कंपनी खासगीकरण व निलंबित कर्मचाºयांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन छेडण्यात आले. कंपनीच्या विरोधात घोषणा देत वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले.

Movement of the Malegaon electricity workers association | मालेगावी वीज कर्मचारी संघटनेचे आंदोलन

मालेगावी वीज कर्मचारी संघटनेचे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन एक दिवसाआड आंदोलन सुरू

मालेगाव कॅम्प : मालेगावी सध्या वीज वितरण कंपनी कर्मचारी संघटनांचे एक दिवसाआड आंदोलन सुरू असून, सोमवारी वीज कंपनी खासगीकरण व निलंबित कर्मचाºयांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी वीज कंपनीच्या विविध कार्यालयांवर आंदोलन छेडण्यात आले. कंपनीच्या विरोधात घोषणा देत वरिष्ठ अधिकाºयांना निवेदन दिले.
मालेगावी वीज वितरण कंपनी खासगीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. शासनाने मालेगाव विभाग खासगीकरण करण्यासंदर्भात निविदा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी याचा विरोध केला आहे. याचा निषेध करण्यासाठी कंपनीच्या कॅम्प, दाभाडी रस्त्यावरील उपकेंद्रालगत असलेल्या मंडळ कार्यालयावर मालेगावसह सटाणा, कळवण, देवळा कसमादे पट्ट्यातील इतर विभागातील सर्व कर्मचारी संघटना एकवटल्या होत्या. त्यांनी मंडळ कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. खासगीकरणचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करीत केली. खासगीकरणामुळे कर्मचारी व वीजग्राहक हे दोघे भरडले जाणार आहेत तर नवीन कंपनीचे आर्थिक घडामोडी कामकाज सर्वसामान्यांना परवडणार नसल्याचे संघटनेच्या नेत्यांनी सांगितले तर खासगीकरण रद्द करण्यासाठी संघटनेतर्फे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख यांना निवेदन दिले. आज दुसरे आंदोलन मोतीभवन कार्यालयावर संघटनेतर्फे छेडण्यात आले. यात कंपनी आकस बुद्धीने एकतर्फी कारवाई करून चार चतुर्थश्रेणी कामगारांना तडकाफडकी निलंबित केले. त्यांचे निलंबन रद्द करीत खरे दोषी असलेल्या व्यक्तींना समज द्यावी यासाठी आंदोलन केले. दुपारी दीड वाजता मंडळ कार्यालय व दुपारी ४ वाजता मोतीभवन कार्यालय येथे आंदोलन केले असल्याने आजचा दिवस आंदोलनाचा ठरला. आंदोलनामध्ये महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्टÑ वीज कामगार महासंघ, भारतीय वीज कामगार सेना, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियन, महाराष्टÑ राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्टÑ राज्य मागासवर्गीय कामगार आदी संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, वीज कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Movement of the Malegaon electricity workers association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.