चांदवडला मराठा समाजाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:16 AM2021-05-07T04:16:07+5:302021-05-07T04:16:07+5:30
या वेळी गणेश बाळासाहेब ठाकरे, दीपक हांडगे, दत्तात्रय गांगुर्डे, अनिल कोतवाल, राजेंद्र खांगळ, जितेंद्र कोतवाल आदींसह कार्यकर्ते ...
या वेळी गणेश बाळासाहेब ठाकरे, दीपक हांडगे, दत्तात्रय गांगुर्डे, अनिल कोतवाल, राजेंद्र खांगळ, जितेंद्र कोतवाल आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत दिलेला निकाल हा मराठा आरक्षणाच्या विरोधात असून या निकालाच्या कामी केंद्र व राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडण्यास कसूर केली. मराठा समाजाच्या आवश्यक गरजांचा विचार न करता सदरची बाब निष्काळजीपणे हाताळल्याने हा निकाल विरोधात गेला. सदर निकालाबाबत सकल मराठा समाज चांदवड तालुक्याच्या वतीने केंद्र व राज्य सरकारचा निषेध करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर व शांतताप्रिय मार्गाने लढा देणाऱ्या मराठा समाजासाठी काळा दिवस आहे. शासनाने यावर योग्य तो मार्ग काढून आरक्षण मिळवून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फोटो : 06 एम.एम.जी.2
चांदवड येथे मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देताना दत्तात्रय गांगुर्डे, दीपक हांडगे, आर.के. खांगळ, अनिल कोतवाल, जितेंद्र कोतवाल, गणेश ठाकरे आदी.
-----------------------------------------------------------------------------
चांदवडला ३२ नवीन बाधित रुग्ण
चांदवड : चांदवड शहरात ५ मे रोजी १२३ व्यक्तींपैकी ३२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील विविध भागांतील असून तालुक्यातील आसरखेडे, भयाळे, भोयेगाव, धोंडबा, हट्टी, कळमदरे, परसुल, शिंगवे, तिसगाव, वडाळीभोई, बहादुरी, भाटगाव, भुत्याणो, दरेगाव, हिरापूर, कानडगाव, मेसनखेडे खुर्द, निमोण, वडनेरभैरव, कानमंडाळे, खडकओझर, दिघवद, वाकी, विटावे, वागदर्डी येथील अन्य ७० रुग्ण असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
===Photopath===
060521\06nsk_22_06052021_13.jpg
===Caption===
फोटो : 06 एम.एम.जी.2