किमान वेतनासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:22 AM2017-08-01T01:22:03+5:302017-08-01T01:22:15+5:30
चांदवड : येथील मंगरुळ (ता. चांदवड) टोलनाक्यावर किमान वेतनासाठी कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी ११ वाजता निदर्शने व धरणे आंदोलन केले. केंद्र सरकारने सुधारित किमान वेतन जानेवारी १७ पासून लागू करण्याचे राजपत्र जारी केले असतानाही टोल व्यवस्थापन याची दखल घेत नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांनी मध्यस्थी करूनही व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. या कारणाने महाराष्टÑ राज्य टोल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली चांदवड येथील टोलनाक्यासमोर निदर्शने करण्यात आली. या कर्मचाºयांच्या समर्थनार्थ पिंपळगाव टोलनाका व महाराष्टÑातील विविध टोल प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपथित होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे वि. गो. पेंढारकर, टोल कामगार संघटनेचे रामेश्वर भावसार, पांडुरंग भंडागे, अजय लोढा यांची भाषणे झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनात सी. बी. जाधव, सुधीर डांगळे, मनीष राजगिरे, प्रकाश म्हैसधुणे, भाऊसाहेब धाकराव, सुभाष गडाख, संतोष साळवे, सुरेंद्र बागुल, दिगंबर मोरे, मीनाक्षी गांगुर्डे, भाग्यश्री उघडे, भारती निकम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.