नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीसाठी हालचाली गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:44 AM2018-02-27T00:44:50+5:302018-02-27T00:44:50+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती.
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीवरील आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागांवर बुधवारी (दि.२८) दुपारी २ वाजता होणाºया विशेष महासभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून, महापौरांनी सोमवारी (दि.२६) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. स्थायी समितीवरील आठपैकी भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, कॉँग्रेस व राष्टÑवादीचे प्रत्येकी एक सदस्य निवृत्त झाले आहेत. या रिक्त जागांवर निवड करण्यासाठी सेना-भाजपाने इच्छुकांची नावे प्रदेश नेत्यांकडे पाठविली असून, बुधवारी होणाºया महासभेतच त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. भाजपाकडून निवृत्त झालेले सदस्य शशिकांत जाधव, जगदीश पाटील, अलका अहिरे हे पुन्हा एकदा इच्छुक आहेत, तर सतीश सोनवणे यांचेही नाव अग्रभागी आहे. शिवसेनेकडून १२ जण इच्छुक असून, त्यात महिलांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसकडून समीर कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित असून, राष्टÑवादीकडून समिना मेमन किंवा शोभा साबळे यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाने स्थायीवरील आपल्या उर्वरित सदस्यांचेही राजीनामे घेतले असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्या रिक्त जागांवर निवड केली जाण्याची शक्यता आहे. मनसेकडूनही मुशीर सय्यद यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थायीवर सर्वच्या सर्व नवीन चेहरे पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.