राज्यातील गड-किल्ले संरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:17 PM2017-12-16T17:17:00+5:302017-12-16T17:17:52+5:30
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील गड, किल्ले व दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत या मागणीसाठी शिवकार्य गड-कोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
राज्यातील सर्व भुईकोट, गिरिदुर्ग, जलदुर्गांना संरक्षण देऊन हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन गड-किल्यांना संरक्षण देण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दिवसेंदिवस दुरवस्था होत असून, हा ऐतिहासिक ठेवा असुरक्षित झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील विविध भागांत असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करून त्यांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील विविध किल्ल्यांचा चित्रीकरणासह वेगवगेळ्या माध्यमातून व्यावसायिक वापर सुरू आहे. परंतु अशाप्रकारे व्यावसायिक वापर करणाºया अनेकांकडून गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपले जात नसल्याने संबंधित ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था होत आहे. ही दुरवस्था रोखण्यासाठी सरकाने या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन करून राज्यातील गड-किल्ल्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.