केंद्र सरकारच्या निषेधार्थ सीटूच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 07:40 PM2021-05-26T19:40:31+5:302021-05-26T19:45:43+5:30

नाशिक :  कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६)  काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Movement in the new industrial zone of the Central Government | केंद्र सरकारच्या निषेधार्थ सीटूच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात निदर्शने

केंद्र सरकारच्या निषेधार्थ सीटूच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात निदर्शने

Next
ठळक मुद्देश्रमजीवी,कृषी कायद्यांना विराेध सीटू कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

नाशिक कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६)  काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत आहेत तरी देखील मोदी सरकार यावर कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही.तसेच कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे या मागण्यांसाठी व काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हा सीटूच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदाेलनात  जिल्हाध्यक्ष सिताराम ठोंबरे,सेक्रेटरी संतोष काकडे,तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे,मोहन जाधव,आत्माराम डावरे,अरविंद शहापुरे,दीपक घोरपडे,नितीन सूर्यवंशी,गौतम कोंगळे, निवृत्ती केदार,प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.  

 दरम्यान, अंबड,सातपुर,सिन्नर व पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यातील पाच हजारावर कामगारांनी आपापल्या कंपनीच्या गेटवर घोषणा देऊन निदर्शने केली. पाळला. सातपूर येथील जुन्या सी.आय.टी.यू ऑफिस येथे कॉ. सिंधू शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी निषेध आंदोलन केले.मालेगाव येथील यंत्रमाग कामगार व सिटूचे कार्यकर्ते रमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.संजीवनगर भागातील कामगारांनी देखील मोदी सरकारचा निषेध केला.

Web Title: Movement in the new industrial zone of the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.