उपनगर भागात पोलिसांचे संचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:29 AM2019-04-21T00:29:11+5:302019-04-21T00:29:30+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी आॅल आउट कोम्बिंग आॅपरेशनमध्ये मारामारी व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी संशयितांना ताब्यात घेतले. रात्री परिसरात पोलिसांनी संचलन करत वाहन तपासणीदेखील केली.

 Movement of police in suburban area | उपनगर भागात पोलिसांचे संचलन

उपनगर भागात पोलिसांचे संचलन

googlenewsNext

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी आॅल आउट कोम्बिंग आॅपरेशनमध्ये मारामारी व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी संशयितांना ताब्यात घेतले. रात्री परिसरात पोलिसांनी संचलन करत वाहन तपासणीदेखील केली.
उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी रात्री देवळालीगाव, रोकडोबावाडी, सुंदरनगर, फर्नांडिसवाडी, कॅनॉलरोड आम्रपाली झोपडपट्टी आदी भागात आॅल आउट व कोम्बिंग आॅपरेशन मोहीम राबविली. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, हिस्ट्रिशिटर यांच्या घरी तपासणी करण्यात आली. उपनगर पोलीस ठाण्यातील मारामारीच्या गुन्ह्यातील जयराम नामदेव लोंढे व इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी संशयित वतन ब्रह्मानंद वाघमारे आढळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॉटेल्स, ढाबा, लॉजचीदेखील तपासणी करून कारवाई करण्यात आली आहे, तर नाकाबंदीत १६३ वाहनांची तपासणी करून दहा वाहनचालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. अजामीनपात्र वॉरंटमधील पप्पू सोपान वावळे, कृष्णा निवृत्ती बिन्नीवाले (रा. आम्रपाली झोपडपट्टी कॅनॉलरोड) यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी संचलनदेखील केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Web Title:  Movement of police in suburban area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.